शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मेस्सी ‘मॅजिक’ने अज्रेन्टिनाची बाद फेरीत धडक

By admin | Updated: June 22, 2014 11:34 IST

लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वात ‘जादूगर’ म्हणून का ओळखल्या जातो, याची प्रचिती चाहत्यांना शनिवारी विश्वकप फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धच्या लढतीदरम्यान आली.

बेलो होरिझोन्टो : लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वात ‘जादूगर’ म्हणून का ओळखल्या जातो, याची प्रचिती चाहत्यांना शनिवारी विश्वकप फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धच्या लढतीदरम्यान आली. इंज्युरी टाईममध्ये मेस्सीने डाव्या पायाने नोंदविलेल्या अफलातून गोलच्या जोरावर अज्रेन्टिनाने ‘फ’ गटाच्या लढतीत इराणची झुंज 1-क् ने मोडून काढली आणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत धडक मारली. 
आज खेळल्या गेलेली लढत जवजवळ अनिर्णीत संपणार असल्याचे चित्र होते, पण मेस्सीने डाव्या पायाने मारलेला फटका या लढतीत अफलातून गोलरक्षण करणा:या इराणचा गोलकिपर अलिरजा हकिकीला गुंगारा देत केव्हा गोलजाळ्यात विसावला हे, दस्तरखुद अलिरजालाही कळले नसावे. अखेर जादूगारने मारलेला फटका चाहत्यांना भूरळ पाडून गेला हे विशेष. दोन लढतीत 6 गुणांची कमाई करणा:या अज्रेन्टिनाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या लढतीत अज्रेन्टिनाची भिस्त मेस्सीच्या कामगिरीवर अवलंबून होती आणि त्यानेही लौकिकाला साजेशी कामगिरी करीत संघाचा विश्वास सार्थ ठरविला. 
इराणने या लढतीत बचावात्मक पवित्र स्वीकारला होता. त्यांनी बचावासाठी सात खेळाडूंची फौज तैनात केल्यामुळे अज्रेन्टिना संघ गोल नोंदविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. मध्यंतरापूर्वी चेंडूवर अधिकवेळ इराणचे वर्चस्व होते. इराणला गोल नोंदविण्याची संधीही प्राप्त झाली होती, पण मिडफिल्डर अशकान देजागा याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. त्यानंतर मात्र अज्रेन्टिनाने वर्चस्व गाजविले. इराणचा गोलकिपर हकिकची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मध्यंतरार्पयत गोलफलक कोराच होता. अज्रेन्टिनाला 22 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती. हिगुएनच्या पासवर स्ट्रायकर अगुएराने जोरकस फटका मारला, पण हकिकीने सूर मारत अप्रतिम बचाव केला.  मध्यंतरानंतर इराणला खाते उघडण्याची संधी होती, पण अज्रेन्टिनाच्या गोलकिपरने चमकदार कामगिरी करीत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. (वृत्तसंस्था)