शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

बीसीसीआयला एमसीएचे पुन्हा पत्र

By admin | Updated: May 13, 2014 06:02 IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वानखेडेवर होणारी आयपीएलची अंतिम लढत हलविण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाविरोधात आवाज उठविल्यानंतर पुन्हा एकदा पत्र पाठवून विचारणा केली आहे

 मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वानखेडेवर होणारी आयपीएलची अंतिम लढत हलविण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाविरोधात आवाज उठविल्यानंतर पुन्हा एकदा पत्र पाठवून विचारणा केली आहे. सोमवारी बैठक बोलावून एमसीएच्या पदाधिकार्‍यांनी बीसीसीआयला पत्र पाठवले आणि त्यावर मंगळवारपर्यंत उत्तर अपेक्षित असल्याचे एमसीएच्या पदाधिकार्‍याने सांगितले. या पत्रात एमसीएने बीसीसीआयला सामन्यांसाठी केलेल्या तयारीची माहिती लिहिली आहे. यात मोठे लाऊडस्पिकर वापरण्याची आणि फटाक्यांची आतषबाजी करण्याची विशेष परवानगी पोलिसांकडून घेतली असल्याचे नमूद केले आहे. प्रमुख व्यक्तिंच्या पाहुणचारात झालेली हेळसांड आणि पार्कि गच्या मुद्यावरून झालेला गदारोळ या मुद्यांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येईल असा विश्वासही एमसीएने व्यक्त केला आहे. याच दोन प्रमुख कारणांमुळे आयपीएलची अंतिम लढत हलविण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावल्यानंतर वानखेडेवर आयपीएलची अंतिम लढत झालेली नाही, हा मुद्या पत्रात विशेष उल्लेखला आहे. ३ मे च्या लढतीत आयपीएलचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर आणि अध्यक्ष रणजीब बिस्वाल यांना एमसीएच्या सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आले होते. या दोघांच्या वाहनांना पार्किंग देखील नाकारण्यात आले. यावर बीसीसीआय भडकलेले दिसते.एमसीएने त्यावर बाजू मांडताना म्हटले की बीसीसीआय किंवा आयपीएलने आगमनाबाबत एमसीए पदाधिकार्‍यांना पुर्वकल्पना देणे आवश्यक होते. आयपीएलचे सीओओ सुंदर रमन यांनी एमसीएच्या पदाधिकार्‍यांशी समन्वय साधायला हवा होता, असे मत एमसीएचे सदस्य नदीम मेमन यांनी व्यक्त केले. आयपीएलची संचालन समितीची मंगळवारी बैठक होणार आहे आणि एमसीएला या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. अंतिम लढतीच्या निर्णयाव्यतिरिक्त एमसीएने एलिमिनेटर लढत सीसीआयला देण्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला. २८ मे ला ही लढत सीसीआय स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार राज्य संघटनेच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही सामन्याचे आयोजन होऊ शकत नाही. एमसीएच्या आवाहनाला आयपीएल संंचालन परिषद किती दाद देते हे आता पाहायचेय! पण जाणकारांच्या मते बीसीसीआय एमसीएला दुखावणार नाही कारण एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजस्थान क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित मोदी यांच्या निलंबनावरुन आधीच बीसीसीआयच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान निलंबित राजस्थान क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व ललित मोदी यांचे वकील महमुद अब्दी यांनी आयपीएलच्या अंतिम लढतीच्या स्थानामध्ये बदल करण्याच्या निर्णयावर टीका केली. आयपीएल संचालन परिषदेने मुंबईचे यमजानपद काढून घेताना अंतिम लढत बेंगळुरूमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. हे श्रीनिवासन यांच्या गटाचे काम असल्याचे अब्दी यांनी म्हटले आहे.आयपीएलच्या अंतिम लढतीचे यमजानपद मुंबईकडून काढून घेणे चुकीचे आहे,असेही ते म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)