शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मॅक्सवेल-मिलर वादळ पुन्हा घोंघावणार?

By admin | Updated: May 14, 2014 02:32 IST

वादळाचा तडाखा म्हटले की वाताहत ही आलीच. यंदाच्या आयपीएलमध्ये असेच वादळ घोंघावत आहे. त्याचे नाव आहे ‘मॅक्सवेल-मिलर’ वादळ!

आज लढत : सनरायजर्स किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झुंजणार

हैदराबाद : वादळाचा तडाखा म्हटले की वाताहत ही आलीच. यंदाच्या आयपीएलमध्ये असेच वादळ घोंघावत आहे. त्याचे नाव आहे ‘मॅक्सवेल-मिलर’ वादळ! किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात असलेल्या या दोन फलंदाजांच्या रूपातील वादळ आता हैदराबादमध्ये दाखल झाले आहे. बुधवारी (दि. १४) यजमान सनरायजर्स हैदराबादविरुद्ध हे वादळ येऊ नये, अशीच इच्छा या संघाच्या चाहत्यांची असणार. मात्र, वादळ हे कोण्याच्या इच्छेवर नव्हे, तर आपल्या धुंदीत जगत असते. त्यामुळे मॅक्सवेल-मिलर यांच्या रूपातील वादळ उद्या घोंघावणार काय, याबाबत जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. राजीव गांधी स्टेडियमवर या सामन्याच्या निमित्ताने चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवण्याची सुवर्णसंधी हैदराबादवासीयांना मिळणार आहे. उद्या भिडणार्‍या दोन संघांपैकी ही लढत यजमान हैदराबादसाठी जास्त महत्त्वाची आहे. कारण हा संघ सध्या ९ सामन्यांत ४ विजय व ५ पराभव अशा कामगिरीसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. प्लेआॅफ फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी या संघासाठी पंजाबविरुद्ध विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संघासमोर उद्या केवळ मॅक्सवेल-मिलर वादळाला रोखण्याचाच नव्हे, तर सामना जिंकण्यासाठी दबाव असेल. दुसरीकडे ७ विजय व २ पराभव, अशा प्रभावी कामगिरीसह अव्वल स्थानी असलेल्या पंजाबवर या लढतीत कोणताही दबाव नसेल. मॅक्सवेलबाबत काय सांगावे? ९ टी-२० सामन्यांत ४७४ धावा ही अचाट कामगिरी कोणत्याही संघाच्या उरात धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहे. मिलरनेदेखील २९७ धावा फटकावून सर्व प्रतिस्पर्धी संघांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. सेहवाग फॉर्मात येत आहे. तो पूर्वीच्या लयीत आला, तर हैदराबादच्या गोलंदाजांचे उद्या काही खरे नाही. उद्याच्या लढतीसाठी हैदराबादवर काहीसा दबाव असला, तरी हा संघ धक्कादायक निकाल नोंदवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मागील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला लोळवण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे पंजाबला पराभूत करणे अशक्य नसल्याचा विश्वास हैदराबाद संघात नक्कीच निर्माण झाला असेल. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघातील २-३ महत्त्वाचे खेळाडू क्लिक झाल्यास पंजाबवर स्पर्धेतील तिसरा पराभव पत्करण्याची वेळ येऊ शकते. उद्या विजयाबरोबरच प्लेआॅफची आशा कायम ठेवण्यासाठी हैदराबादला २ गोष्टींची नितांत आवश्यकता असेल. एक पहिल्या षटकापासून पंजाबवर दबाव आणणे व दुसरे कामगिरीत सातत्य राखणे. (क्रीडा प्रतिनिधी)