शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना म्हणजे उपांत्यपूर्व लढत

By admin | Updated: June 10, 2017 04:41 IST

धावफलकावरील धावा आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजांनी दाखविलेला फॉर्म बघितल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील

व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...धावफलकावरील धावा आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजांनी दाखविलेला फॉर्म बघितल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कागदावरील बलाबल निकाल निश्चित करीत नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. बुधवारी पाकिस्तान संघाने क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला. त्यापासून प्रेरणा घेत श्रीलंका संघाने भारताने दिलेल्या ३२२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. श्रीलंका संघाने विशाल धावसंख्येचे लक्ष्य ज्या सहजतेने गाठले त्यामुळे मी प्रभावित झालो. पहिल्या १० षटकांत भारतीय संघाचे वर्चस्व असतानाही श्रीलंका संघाने दडपण बाळगले नाही. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा गोलंदाजीला आल्यानंतर धनुष्का गुणतिलका व कुसल मेंडिस यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्यानंतर भारतीय संघ दडपणाखाली आला. श्रीलंकेच्या फलंदाजांचे कौशल्य उत्तम होतेच, पण त्यांनी दाखवलेला संयम वाखागण्याजोगा होता. त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी दाखविलेली बेदरकार वृत्ती प्रशंसेस पात्र होती. गुणतिलका व मेंडिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी करीत विजयाचा पाया रचला. त्यानंतरही आलेले मधल्या फळीतील फलंदाजही ड्रेसिंग रुममधूनच सेट होऊन आल्याप्रमाणे खेळत होते. त्यानंतर कुसल परेरा आणि असेला गुणरत्ने यांनी विजय सुकर केला. या दोघांनी अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजवरील दडपण कमी केले. मॅथ्यूज सात महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे त्याच्या फलंदाजीमध्ये पूर्वीचा टच नव्हता. भारतीय गोलंदाजांनी सुमार मारा केला असे नाही. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीच्या तुलनेत भारताची क्षेत्ररक्षणातील कामगिरीही सुधारलेली दिली. पण, पांड्या व जडेजा यांच्याविरुद्ध धावा फटकावल्या गेल्यानंतर विराट कोहलीकडे विशेष पर्याय शिल्लक नव्हते. त्यामुळे त्याने स्वत:सह केदार जाधवचाही गोलंदाजीमध्ये उपयोग केला.आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक आहे. पाकिस्तानच्या फिरकीपटूंविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाज संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे केदार जाधवच्या स्थानी आर. अश्विनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याची वेळ आलेली आहे. अश्विनच्या जोडीला जडेजा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. भारतीय फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचा समतोल कायम राखत फलंदाजाच्या मोबदल्यात एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याचा पर्याय भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो. पराभवामुळे भारतीय संघ निराश झाला असेल, पण मनोधैर्य ढासळू देण्याची गरज नाही. शिखर धवनने शानदार खेळी केली तर रोहित शर्माने कामगिरीत सातत्य राखले. चांगल्या सुरुवातीनंतर एम.एस. धोनीला आक्रमक फलंदाजी करताना बघणे सुखावह होते.मनोधैर्य उंचावलेल्या श्रीलंकेविरुद्धचा पराभव इशारा देणारा आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला आता उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झाले असून यात भारतीय संघ निश्चितच बाजी मारेल, असा मला विश्वास आहे. (गेमप्लॉन)