शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मारिया शारापोव्हा, जोकोवीच तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: July 2, 2015 03:18 IST

गतविजेता नोवाक जोकोवीच व माजी विजेती मारिया शारापोव्हा आणि एम रॉनिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करतील विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

लंडन : गतविजेता नोवाक जोकोवीच व माजी विजेती मारिया शारापोव्हा आणि एम रॉनिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करतील विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोेविचने फिनलंडच्या जार्को निमिनेन याला सरळ सेटमध्ये पराभूत करत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोवीचने नेमिनेन याला ६-४, ६-२, ६-३ असे पराभूत केले. महिलांच्या एकेरीमध्ये चौथ्या मानांकित शारापोव्हाने नेदरलॅँडच्या रिचेल होगेनकॅँपला ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. शारापोव्हाला तिसऱ्या फेरीत उक्रेनची लेसिया सुरेनको व रोमानियाची इरीना कामेलिया बेगुुु यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याशी लढावे लागणार आहे. दुसरीकडे पुरुष एकेरीत कॅनडाच्या एम. रॉनिकने जर्मनीच्या टॉमी हॅसला चुरशीच्या झालेल्या लढतीत ६-०, ६-२, ६-७ (५-७), ७-६ (७-४) असे नमविले. महिला गटात गतउपविजेत्या युजिनी बुकार्ड आणि गतस्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेल्या सिमोना हालेप यांना मात्र धक्कादायकरीत्या हार पत्करावी लागली. फ्रान्सच्या जेरेमी चार्डी विरुद्ध झालेल्या या सामन्यात बेर्दिजने झुंजार खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक सेट जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना बेर्दिजने ६-२, ६-७, ७-६, ७-६ असा झुंजार विजय मिळवून विजयी सलामी दिली. गतवर्षी अंतिम फेरीत धडक मारून सर्वांना चकीत करणाऱ्या युवा बुकार्डचे आव्हान यंदा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. १२व्या मानांकित कॅनडाच्या बुकार्डाला चीनच्या की यिग डुयान विरुद्ध ६-७, ४-६ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला तृतीय मानांकित हालेपला चांगल्या सुरुवातीनंतरही पहिल्याच सामन्यात स्पर्धेबाहेर व्हावे लागले. स्लोवाकियाच्या याना सेपेलोवा विरुद्ध पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर हालेपला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. सेपेलोवाने सलग दोन सेटमध्ये बाजी मारताना कसलेल्या हालेपला ५-७, ६-४, ६-३ असा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)पेस विजयीभारताचा दिग्गज व अनुभवी खेळाडू लिएंडर पेस याने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरच्या सोबतीने खेळताना विम्बल्डन पुरुष दुहेरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पेस-नेस्टर या ११व्या मानांकित जोडीने सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोयकी - दुसान लाजोव्हिक या जोडीचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ७-५ असा धुव्वा उडवला. दरम्यान, पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस गमावलेल्या पेस - नेस्टर जोडीने पुढच्याच गेममध्ये सर्बियन जोडीची सर्व्हिस ब्रेक करताना दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या बाजूला भारताच्या पुरव राजा आणि फ्रान्सच्या फॅब्रीस मार्टिन या जोडीला माजी विजेत्या जोनाथन मरे-फ्रेड्रिक नील्सन या जोडीविरुद्ध १-६, ४-६, ६-४, ६-७(७-९) असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला.