मुंबई : आयपीएलच्या धर्तीवर होऊ घातलेल्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) निमित्ताने भारतातील फुटबॉलला संजीवनी देण्याचा प्रय} होणार असल्याने फुटबॉलप्रेमीच नव्हे, तर सर्वानाच याची उत्सुकता लागलेली आहे. गुरुवारी स्पर्धेकरिता परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला आणि त्यात माजी फ्रेंच डिफेंडर बेरनार्ड मेंडी आणि मायकल चोप्रा हे स्टार खेळाडू ठरले. चोप्रा या भारतीय वंशाच्या खेळाडूला सचिन तेंडुलकरच्या केरळ संघाने विकत घेतले, तर मेंडीसाठी सर्वाधिक रक्कम मोजून चेन्नईने दमदार एन्ट्री केली. ही स्पर्धा 12 ऑक्टोबर ते 2क् डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
या लिलावात एकूण 49 परदेशी खेळाडूंच्या पुढील वाटचाली ठरणार होत्या. चेन्नई संघाचा मालक कोण आहे याबाबत आयोजकांनी सांगण्यास नकार दिला असला तरी त्यांनी इंटर मिलान क्लबशी हातमिळवणी केली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
ठळक वैशिष्टय़े
च्क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार्सने या स्पध्रेत उडी मारल्याने याला ग्लॅमरचा तडका मिळाला आहे.
च्तेंडुलकरच्या केरळ संघाने न्यू कॅसल युनायटेडचा माजी स्ट्रायकर मायकल चोपरा याला 58,185 डॉलरमध्ये विकत घेतले
च् चेन्नईने स्वीडनच्या डीजॉर्डीकला, तर स्पॅनिश मिडफिल्डर जोफ्रे माटेउ याला कोलकाताने 58,185 डॉलरमध्ये आपल्या चमूत सामावून घेतले.
च्बंगळुरू संघाने माघार घेतल्याने चेन्नईने एन्ट्री केली. चेन्नईसह या स्पध्रेत मुंबई, पुणो, केरळ, गुवाहटी, दिल्ली, कोलकाता आणि गोवा यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंची यादी : कोलकाता : बोर्जा फर्नाडेज , जोफ्रे गोंझालेज, जोस मिगुएले, आर्नाल काबरे , सिल्वेन मोन्सोरीयू , जाकुब पाडॅनी, अपौला एडिमा एडेल बेटे.
दिल्ली डायनामोस एफसी : मॅड्स जंकर , मोर्टेन स्कुयूबो , ब्रुनो हेरेरो अॅरिआस, गुस्तावो सांतोस, मार्क सेक , पॅवेल एलिआर, हेनरीक डॅनिस ऑलिवेरा डीआस
चेन्नई : बेरनार्ड मेंडी , क्रिस्टीयन गोंझालेज, गेन्नारो ब्रासिग्लिआनो , बोजान डिओर्डीक , ब्रुनो ऑगस्टो लिमा, जैरो अॅड्रेस सुआरेज कार्वाजल , एडुडरे सिल्वा लेर्मा
गोवा : मिरोल्साव स्लेपिका , जॅन सेडा, ब्रुनो फिलिप, टावारेस पिन्हेरिओ, युनेस बेंगेलॉन, मिगुएल ब्रुनो परेरा हेर्लेन, जॉर्जरी अर्नोलिन, एडगार मर्सेलिनो
केरळ ब्लास्टर एफ सी : मायकल चोप्रा, लेन हुम, विक्टर हेरेरो फोर्साडा, एर्विन स्पीत्झर, पेड्रो अॅड्रीअन वेलोसो गुस्माओ, केड्रीस हेंगबार्ट, राफीएल रोमेय
मुंबई सिटी एफसी : डिएगो फर्नाडो नदाल, जॅन स्टोहॅँझ, फ्रान्सीस्को लुक्यूए, पॅवेल सीमोव, जॉहन लेत्झेल्टर, अॅण्ड्रे माटोस डायर परेरा, लिआस पोलालिस
नॉर्थ ईस्ट युनायटेड : एसाक चन्सा, कॉर्नेल ग्लेन, मासाम्बा लो साम्बोउ , डो डाँग ह्युन , गुल्हेर्मे कास्ट्रो , थॉमस जोस, लुईस यानेस
एफसी पुणो सिटी : ब्रुनो सिरिलो, एमान्युएल बेलार्डी (इटली), इवान पॅलासिओस , सैदाउ पॅनाडेंटीग्युरी, ओमार अँड्रेस रॉड्रीग्स मार्टीन, अँड्रेस फेलीप गोंझालेज रॅमिरेज, पार्क क्वांग