शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

30 मार्च म्हणजे "जागतिक माफी दिन", अश्विनने घेतली कांगारूंची फिरकी

By admin | Updated: March 30, 2017 17:57 IST

भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीने मैदानावर फलंदाजांचं तोंड बंद करतोच पण वेळ पडली की तो शब्दांनीही हल्ला चढवतो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीने मैदानावर फलंदाजांचं तोंड बंद करतोच पण वेळ पडली की तो शब्दांनीही हल्ला चढवतो. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. मैदानावर जितका तणाव होता तितकाच मैदानाबाहेरही होता. ऑस्ट्रेलियाच्या  आजी-माजी फलंदाजांनी खास करून भारताचा कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता मालिका संपल्यानंतर माफीसत्राला सुरूवात झाली आहे.
 
नुकतंच विराट कोहलीवर केलेल्या आरोपाबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने त्याची माफी मागितली. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने धरमशाला कसोटीतून माघार घेतली असा आरोप हॉजने केला होता. मालिकेचा निकाल लावणा-या कसोटीत तू खेळणार नाहीस आणि पुढच्या आठवडयापासून सुरु होणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार. तू शेवटच्या कसोटीत नाही खेळलास तर ते योग्य ठरणार नाही अशा शब्दात हॉजने विराटवर टीका केली होती. ब्रॅड हॉजच्या या विधानाचा भारतातील क्रिकेटपटूंनी चांगलाच समाचार घेतला होता. या विधानामुळे आयपीएलमधील आपला रोजगार धोक्यात येऊ शकतो याची कल्पना आल्याने हॉजने विराटची माफी मागितली.  ब्रॅड हॉज गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षक आहे. मी जे विधान केले त्याबद्दल मी भारतातील लोकांची, क्रिकेट चाहत्यांची, भारताच्या क्रिकेट संघाची विशेषकरुन विराट कोहलीची माफी मागतो असे हॉजने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे. कोणावर टीकेचा, अपमान करण्याचा किंवा कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. विराटबद्दल माझ्या मनात आदर असून त्याच्याबद्दल कोणताही वाईट भावना नाही असे हॉजने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.
 
यानंतर आर. अश्विनने हॉजला लक्ष्य करताना ट्विट केलं आहे. यापुढे 30 मार्च हा जागतिक माफी दिवस म्हणून ओळखला जाईल असं ट्विट अश्विनने केलं आहे. त्याचं हे ट्विट सोशल मीडिया वापरणा-यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट आणि लाइक केलं आहे.