शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

बांगला देश दौऱ्यास अनेक संघ नकार देऊ शकतात: मनी

By admin | Updated: July 5, 2016 20:36 IST

ढाक्यातील स्फोटामुळे पाकिस्तानसारखाचा त्रास बांगला देशला होऊ शकतो. अनेक देशांना आपल्या देशाचा दौरा करण्याची विनवणी करण्याची पाळी बीसीसीबीवर येईल.

ऑनलाइन लोकमतकराची, दि. ५ : ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देश बांगला देशचा दौरा करण्यास नकार देऊ शकतात, अशी शंका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी व्यक्त केली आहे.बांगला देश क्रिकेटला पाकिस्तानसारख्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे वक्तव्य करीत मनी पुढे म्हणाले,ह्य अनेक देश बांगला देशात येण्यास टाळाटाळ करू शकतात.ह्ण याच आठवड्यात ढाका येथील एका कॅफेत झालेल्यादहशतवादी हल्ल्यात २० विदेशी नागरिक मारले गेले. तेव्हापासून इंग्लंड सप्टेंबरमध्ये बांगला देश दौऱ्यावर जाणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली.

ढाक्यातील स्फोटामुळे पाकिस्तानसारखाचा त्रास बांगला देशला होऊ शकतो. अनेक देशांना आपल्या देशाचा दौरा करण्याची विनवणी करण्याची पाळी बीसीसीबीवर येईल. दहशतवादामुळे नुकसान सोसण्याची वेळ बीसीसीबीवर येईल, काअशी भीती वाटते. स्फोटात विदेशी नागरिक मारले गेल्यानंतर इंग्लंडची मनधरणी करणे बांगला देशसाठी सोपे जाणार नाही. वेस्ट इंडिजचा १९ वर्षांखालील संघ देखील सुरक्षेचे कारण पुढे करीत काही वर्षांआधी बांगला देश दौरा अर्धवट सोडून निघून गेला होता. आॅस्ट्रेलियाने देखील यंदा बांगला देशात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकातून माघारीचा निर्णयघेतला होता, अशी आठवण मनी यांनी करुन दिली.

ते पुढे म्हणाले,ह्यभारताने २००७ पासून द्विपक्षीय मालिका न खेळल्याने पाक क्रिकेटला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागत आहे. पीसीबीने शासकीय हस्तक्षेप टाळून कठोर निर्णय घ्यायला शिकले पाहिजे, असे माझे मत आहे. द्विपक्षीय मालिकेसंदर्भात बीसीसीआय आपले धोरण बदलत नाही तोवर पाकने आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध खेळू नये. पाक संघ आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध खेळतो.

तेव्हा आयसीसी बोर्ड आणि सदस्य राष्ट्रांना मोठा लाभ होतो. बांगला देश क्रिकेट बोर्डाने अशा स्थितीतही विदेशी संघांचे देशात खेळण्यासाठी मन वळविल्यास मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाला विदेशी संघांचे मन वळविण्यात आलेल्या अपयशाचे वाभाडे निघेल. पीसीबीने विदेशी संघांना पाकमध्ये येण्यास विनंतीकेली का आणि त्यांना यश का आले नाही, हा प्रश्न चर्चेत येणार आहे.

पाक क्रिकेटसाठी आयसीसीकडे विशेष पॅकेजची मागणी करणाऱ्या पीसीबीवर मनी यांनी कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले,ह्य पीसीबीने आयसीसीपुढे हात पसरून देशाची मान झुकविली आहे. आयसीसीकडे भीक मागण्याऐवजी पीसीबीनेस्वत:च्या खर्चावर नियंत्रण आणायला हवे, असा सल्ला मनी यांनी दिला.