शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनु-सुमीत यांचे शानदार विजेतेपद

By admin | Updated: December 23, 2015 01:14 IST

मनु अत्री आणी बी. सुमीत रेड्डी या भारतीय जोडीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये वर्षाची अखेर विजयाने करताना मॅक्सीको ओपनचे शानदार विजेतेपद पटकावले

नवी दिल्ली : मनु अत्री आणी बी. सुमीत रेड्डी या भारतीय जोडीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये वर्षाची अखेर विजयाने करताना मॅक्सीको ओपनचे शानदार विजेतेपद पटकावले. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने थायलंडच्या बोडिन इसारा आणि निपितफोन पी. यांना लोळवले. स्पर्धेत तृतीय मानांकन लाभलेल्या मनु - सुमीत यांनी लौकिकानुसार खेळ करताना अंतिम सामन्यात धडक मारली. याआधी त्यांनी यूएस ओपन आणि डच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे या जोडीवर भारताच्या विजेतेपदाच्या आशा होत्या. दरम्यान, दोन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मनु - सुमीत यांना पहिल्या सेटमध्ये थायलंडच्या जोडीने झुंजवले. २०-१६ अशी भक्कम आघाडी मिळवलेली असताना भारतीयांना प्रतिस्पर्धी जोडीकडून कडव प्रतिकार मिळाला. यावेळी इसार - निपितफोन यांनी जबरदस्त पुनरागमन करताना सलग ४ गुण मिळवून बरोबरी साधली. मात्र मोक्याच्यावेळी खेळ उंवताना भारतीयांनी २२-२० अशी बाजी मारुन १-० अशी आघाडी घेतली.यानंतर पुन्हा एकदा मनु - सुमीत यांनी सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखताना दुसरा सेटही जिंकत इसारा - निपितफोन यांना २२-२०, २१-१८ असा धक्का दिला आणि स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद उंचावले. (वृत्तसंस्था)