मणिपूर, पश्चिम बंगाल अजिंक्य
By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST
राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धांचा समारोप
मणिपूर, पश्चिम बंगाल अजिंक्य
राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धांचा समारोप नाशिक : पाचव्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात मणिपूर, तर महिला गटात पश्चिम बंगाल संघ अजिंक्य ठरले़ मुलींच्या महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फे रीत हरियाणाकडून मात मिळाल्याने स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले़ पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा आज समारोप झाला़ महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते़ मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात मणिपूरच्या संघाने हैदराबाद तेलंगणा संघाचा ८-१ च्या गोलफ रकाने पराभव करत विजय साकार केला़ तत्पूर्वी उपांत्य सामन्यात मणिपूरने मध्य प्रदेशचा ७-० ने पराभव करत अंतिम फे रीत प्रवेश केला होता, तर हैदराबाद तेलंगणा संघाने ३-२ ने दिल्लीचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती़ अंतिम सामन्यात ११ व्या मिनिटाला पहिला गोल करत मणिपूरने आघाडी घेतली ती अखेरपर्यंत कायम होती़ मणिपूरच्या वतीने एल़ बिसरोजीत याने सर्वाधिक चार गोल केले, तर के .अरूल याने तीन गोल केले़ वॉनगम याने एक गोल केला़ तेलंगणाच्या वतीने चिनप्पा राव याने एकमेव गोल केला़ मुलींच्या लढतीत पश्चिम बंगालच्या संघाने हरियाणाच्या तगड्या संघाचा ७-५ च्या गोलफ रकाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ तत्पूर्वी उपांत्य सामन्यात पश्चिम बंगालने मणिपूरचा ६-० ने पराभव केला, तर हरियाणाच्या संघाने महाराष्ट्राच्या संघाला ४-१ ने रोखत अंतिम फे रीत प्रवेश केला होता़ अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात पाचव्या मिनिटाला पश्चिम बंगालने आपले खाते उघडले होते, तर सहाव्या मिनिटाला लगेच दुसरा गोल करून आघाडी मिळवली़ यानंतर हरियाणाच्या संघानेही एकापाठोपाठ एक असे दोन गोल करत बरोबरी साधली़ १६ व्या मिनीटाला पुन्हा गोल करत बंगालने आघाडी घेतली, ती मात्र कायम ठेवली़ अतिशय अटीतटीच्या झालेल्या या लढतीत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती़ पुरुष गटात उत्कृष्ट खेळाडू मणिपूरचा के .एस़ एच़ बांगगूम हा ठरला, तर उत्कृष्ट गोलरक्षक के. अरुल ठरला़ मुलींमध्ये शिवानी बरू उत्कृष्ट खेळाडू, तर इमर इक्का ही उत्कृष्ट गोलरक्षक ठरली़ (जोड)