नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेता मनदीप जांगडा याने अनुभवी विकास कृष्ण याचा पराभव करणार असल्याचे म्हटले आहे. तो मिडलवेट गटात आव्हानासाठी सज्ज झाला आहे. २०१४ च्या ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेल्टरवेट (६९ कि.गॅ्र.) गटात रौप्यपदक पटकाविले होते. आता या वेळी तो एप्रिलमध्ये गोल्ड कोस्टमध्ये होणाºया ७५ कि.गॅ्र. गटात खेळणार आहे.राष्ट्रीय चॅम्पियन मनदीप म्हणाला, की मिडलवेट आणि बेंटमवेट (५६ कि.ग्रॅ.) हे भारतीय बॉक्सर्सचे सुवर्ण गट आहेत. विजेंदरपासून अखिलपर्यंतच्या खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. मला वाटते, मिडलवेटमध्ये आपण बरेच काही करू शकतो. मी ट्रायलमध्ये विकासविरुद्ध खेळलो. मात्र, थोडक्यात हरलो. इंडिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मी थायलंडच्या खेळाडूचा पराभव केला. मला वाटते की अव्वल प्रदर्शनाच्या जवळ पोहोचत आहे. आता पुढील ट्रायलमध्ये विकासला पराभूत करू शकतो.
मनदीप जांगडा म्हणतो, विकासला पराभूत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 03:40 IST