शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मलिका अंतिम फेरीत

By admin | Updated: May 23, 2015 01:02 IST

कसलेल्या भक्ती शाहचा २-० असा पराभव करून ९व्या रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

मुंबई : महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित मलिका मराठे हिने चमकदार आगेकूच कायम राखताना तेलंगणाच्या द्वितीय मानांकित कसलेल्या भक्ती शाहचा २-० असा पराभव करून ९व्या रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी तिच्यासमोर अनपेक्षित विजयांची मालिका गुंफणाऱ्या हरियाणाच्या संदीप्ती सिंगचे कडवे आव्हान असेल.क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १२ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या मलिकाने एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात आक्रमक खेळाच्या जोरावर भक्तीला कोणतीही संधी न देता ६-३, ६-१ असे सहजपणे नमवले. तत्पूर्वी अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात पहिला सेट जिंकूनदेखील कामगिरीत सातत्य न राखल्याने महाराष्ट्राच्या गार्गी पवारला संदीप्तीच्या झुंजार खेळापुढे ६-१, १-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.मुलांच्या १२ वर्षांखालील गटात तेलंगणाच्या अव्वल मानांकित गौरव कुर्वाने आपल्या लौकिकानुसार खेळताना आंध्र प्रदेशच्या हासिथ सुरजनचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. यानंतर तामिळनाडूच्या द्वितीय मानांकित संदीप एस.ने देखील सहज आगेकूच करताना कर्नाटकच्या चौथ्या मानांकित निखिल थिरुमळेचा ६-०, ६-१ असा फडशा पाडला. (क्रीडा प्रतिनिधी)