शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भारतापुढे मलेशियाचे आव्हान

By admin | Updated: July 1, 2015 02:53 IST

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला बुधवारी मलेशियाविरुद्ध झुुंजावे लागेल.

एंटवर्प (बेल्जियम) : साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला बुधवारी मलेशियाविरुद्ध झुुंजावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात बचाव फळीतील कमजोरी दूर करण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे.बेल्जियममध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमिफायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आॅस्ट्रेलियाकडून भारताला ६ गोल खावे लागले. बुधवारी केएचसी ड्रॅगन्स स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय बचाव फळीची मलेशियन आक्रमणापुढे कसोटी लागणार आहे. मलेशियासाठी हा महत्त्वपूर्ण सामना असून, आॅलिम्पिक तिकीट मिळविण्यासाठी ते उद्या कोणतीही कसर सोडणार नाहीत. भारताने या स्पर्धेत युवा संघ उतरवला आहे. भारत गेल्या वर्षी इंचियोन आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवून २०१६च्या आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरला आहे. त्यामुळे या संघात अनेक युवा खेळाडूंना पारखण्याची संधी मिळाली आहे. डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या लीगच्या फायनलमध्ये विजेतेपद मिळविण्यासाठी भारत उत्सुक असेल. त्यामुळे मलेशियाला सहजासहजी विजय मिळणे अशक्य आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला २-६ असा पराभव पत्करावा लागला होता. या निकालाने भारतीय प्रशिक्षक पॉल वॉन ऐस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताला स्टार ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंगची कमतरता जाणवत आहे. तो सराव सामन्यात जखमी झाला आहे. त्याची दुखापत सुधारली आहे; पण त्याला कोणत्याही सामन्यात खेळवलेले नाही. परंतु, भारतीय संघासोबत तो सराव करताना दिसत आहे. भारतीय संघ मलेशियाला हलक्यात घेत नाही. कर्णधार सरदार म्हणाला, की मलेशियाचा संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध आम्हाला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागणार आहे. आम्हाला प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. आम्हाला रूपिंदरसिंगची कमतरता जाणवत आहे. एप्रिलमध्ये इपोह येथे झालेल्या सामन्यात भारत मलेशियाकडून हारला होता; परंतु त्या वेळेचा त्यांचा संघ आताच्या तुलनेत मजबूत होता. या स्पर्धेतून ३ संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. सेमिफायनलमध्ये न पोहोचणाऱ्या संघालाही पात्रतेची संधी मिळू शकते. खंडीय स्पर्धा जिंकून पात्र ठरलेला संघ सेमिफायनलमध्ये पोहोचल्यास या स्पर्धेतील पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघही आॅलिम्पिक पात्रता मिळवू शकतो.