शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य हॉकी कोच एस यांची हकालपट्टी

By admin | Updated: July 25, 2015 02:27 IST

भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वान एस यांची हॉकी इंडियाने

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वान एस यांची हॉकी इंडियाने शुक्रवारी अधिकृत हकालपट्टी केली. हॉलंडच्या या कोचला मायदेशी परत पाठविण्याचा निर्णय होताच आठवडाभरापासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.वान एस यांनी सोमवारी वक्तव्य करीत हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी त्यांना पदावरून दूर सारल्याचे म्हटले होते. बत्रा यांनी त्यांना पदावरून दूर केलेले नसल्याचा पुनरुच्चार करीत कोचबाबत निर्णय घेण्यासाठी समिती असल्याचा दावा केला होता. माजी आॅलिम्पिकपटू आणि खेळाडूंचा समावेश असलेल्या हॉकी इंडियाच्या समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत अखेर पॉल वान एस यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला.हॉकी इंडियाने बेल्जियमच्या एन्टवर्प शहरात झालेल्या विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत भारताच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी गत रविवारी विशेष समिती स्थापन केली होती. पुरुष संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यानंतर चौथ्या स्थानावर राहिला होता. महिला संघ उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होताच पाचव्या स्थानावर घसरला. समितीच्या अध्यक्षस्थानी माजी आॅलिम्पिकपटू हरविंदरसिंग होते. अन्य सदस्यांत बी. पी. गोविंदा, व्ही. भास्करन, ए. बी. सुबय्या, तोयबासिंग, आर. पी. सिंग, असुंता लाक्रा आणि जसजित कौर यांचा समावेश आहे. या बैठकीत पॉल वान एस यांचा मुद्दा चर्चेला आलाच.५४ वर्षांचे पॉल वान यांनी हॉलंडमधील आपल्या घरून जो ई-मेल पाठविला त्यात, ‘मला बत्रा यांनी बळजबरीने हटविले असून, हॉकी इंडियाने मला पुरावे देण्यास सांगितल्यास मी स्वत:ची बाजू मांडू शकतो. हॉकी इंडियाचा अखेरचा फैसला पाहून मी हा मेल सार्वजनिक करू शकतो’ म्हटले.(वृत्तसंस्था)