शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्रसिंह धोनीला दिलासा

By admin | Updated: September 6, 2016 01:48 IST

स्वत:ला ईश्वराच्या रूपात सादर करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मेहेंद्रसिंह धोनीवर दाखल करण्यात आलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाली काढले.

नवी दिल्ली : एका नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर स्वत:ला ईश्वराच्या रूपात सादर करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मेहेंद्रसिंह धोनीवर दाखल करण्यात आलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाली काढले. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने धोनीला दिलासा देताना म्हटले, की कर्नाटकाच्या न्यायालयाने कायदेशिर प्रक्रियेचे पालन न करता या क्रिकेटपटूला नोटिस बजावण्याची चूक केली. पीठाने म्हटले, की ‘आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करताना हे प्रकरण खारीज करीत आहोत. त्यात आरोपीला समन्स पाठविण्याच्या आदेशाचाही समावेश आहे. आम्ही आदेश पारीत करताना तक्रार आणि कथित गुन्ह्याचा विचार केला आहे.’सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी धोनीविरुद्ध गुन्हेगार म्हणून कारवाई करण्याला स्थगिती दिली होती. धोनीविरुद्ध एका नियातकालिकाच्या मुखपृष्ठावर कथित प्रकरणी स्वत:ला भगवान विष्णूच्या रूपात सादर केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने धोनीविरुद्ध गुन्ह्याची कारवाई स्थगित करण्यास नकार दिला होता. धोनीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना विशेष याचिका दाखल केली होती. सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरमथ यांनी याचिका दाखल करताना धोनीवर आरोप केला होता, की एका नियातकालिकाच्या मुखपृष्ठावर त्याला भगवान विष्णूंच्या रूपात दाखविण्यात आले आहे. त्याच्या हातात अनेक वस्तू दाखविण्यात आल्यात असून, त्यात बुटाचाही समावेश आहे. तक्रारीची दखल घेतलाना अतिरिक्त मुख्य मट्रोपोलिटन मॅजिस्टेटने धोनीविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम २९५ नुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि कलम ३४ (हेतुपुरस्सर) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर धोनी न्यायालयात उपस्थित न झाल्यामुळे मॅजिस्टेटने धोनीविरुद्ध समन्स बजावले होते. त्याविरुद्ध धोनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. (वृत्तसंस्था)