शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदासाठी योग्यच

By admin | Updated: June 23, 2015 01:38 IST

बांगलादेशचा नवोदित युवा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा पराभव झाला आहे

पुणे : बांगलादेशचा नवोदित युवा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा पराभव झाला आहे. इतिहास पाहता अनेक नवोदित गोलंदाजांनी पदार्पणात उत्कृष्ट फलंदाजांनाही चकविलेले आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पराभवासाठी दोषी धरु नये, त्यानेच कर्णधारपदाची धुरा सांभाळली पाहिजे अशी जोरदार पाठराखण भारतीय संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी केली आहे. तसेच धोनीने कधीही कर्णधारपद सोडण्याचे म्हटले नसताना माध्यमांनीच तसा दावा केल्याचेही बोर्डे म्हणाले. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भारतावर मालिका गमाविण्याची नामुष्की ओढावली आहे. या सामन्यानंतर धोनीने पत्रकारांशी बोलताना अप्रत्यक्षरित्या कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले होते. मला कर्णधारपदावरुन हटविल्याने भारतीय क्रिकेटचे चांगले होणार असेल तर मी एक खेळाडू म्हणून खेळण्यास तयार आहे. भारतीय संघात काही चुकीचे झाले की त्याला मीच जबाबदार असतो अशी निराशाजनक प्रतिक्रिया देखील त्याने दिली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना बोर्डे म्हणाले, बांगला देशाचा युवा गोलंदाज मुस्तफिजुरच्या गोलंदाजीत विविधता होती. त्याने दोन सामन्यांत घेतलेल्या ११ बळींसाठी त्याचे कौतुक करायला हवे. मात्र त्याचा सामना करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. क्रिकेटचा इतिहास पाहता शेन वॉर्न, अजंता मेंडिस या सारख्या काही गोलंदाजांनी देखील सुरुवातीला भल्या भल्या फलंदाजांना चकवा दिला होता. त्या उलट धोनी एक संयमी व चांगला कर्णधार आहे. एक मालिका गमावल्यावर त्याला नाकारणे चुकीचे आहे.