शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या महेशची धमाकेदार आगेकूच

By admin | Updated: July 14, 2016 20:51 IST

महाराष्ट्राच्या कसलेल्या महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार आक्रमकक खेळ करताना महाराष्ट्राच्याच अभिषेक प्रधानला सरळ तीन सेटमध्ये नमवून ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय

राष्ट्रीय स्क्वॉश : सौरव, दिपिका, जोश्ना यांचीही अपेक्षित कामगिरी

मुंबई : महाराष्ट्राच्या कसलेल्या महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार आक्रमकक खेळ करताना महाराष्ट्राच्याच अभिषेक प्रधानला सरळ तीन सेटमध्ये नमवून ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. त्याचबरोबर सौरव घोषाल, हरिंदरपाल सिंग संधू, जोश्ना चिन्नप्पा आणि दिपिका पल्लीकल या अव्वल खेळाडूंनीही विजयी आगेकूच केली.मुंबईतील ओट्टर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महेशने आपला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ करताना महाराष्ट्राच्याच अभिषेकला स्क्वॉशचे धडे देताना ११-३, ११-९, ११-५ असे नमवले. तसेच अव्वल राष्ट्रीय स्क्वॉशपटू तामिळनाडूच्या सौरवने अपेक्षित विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करताना उत्तर प्रदेशच्या रणजीत सिंगचा ११-३, ११-५, ११-८ असा धुव्वा उडवला. हरिंदरपाल सिंग संधू याला मात्र विजयी आगेकूच करण्यासाठी दिल्लीच्या गौरव नंदराजोगविरुध्द चांगलेच झुंजावे लागले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत तामिळनाडूच्या हरिंदरपालने ११-३, ११-६, ८-११, ४-११, ११-१ असा विजय मिळवला. महिलांमध्ये गतविजेती आणि अग्रमानांकीत तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पाने शानदार विजयी कूच करताना मचुमा बेगम चौधरीला ११-३, ११-०, ११-० असे पराभूत केले. तर द्वितीय मानांकीत दिपिका पल्लीकलने देखील सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना जम्मू-काश्मिरच्या नितू शर्माला ११-०, ११-१, ११-० असे लोळवले. (क्रीडा प्रतिनिधी)इतर निकाल : उप - उपांत्यपुर्व फेरी(पुरुष) :विजय कुमार (तामिळनाडू) वि.वि. वीर छोत्रानी (महाराष्ट्र) ११-५, ११-२, ११-७; विक्रम मल्होत्रा (महाराष्ट्र) वि.वि. संदीप जांग्रा (दिल्ली) ११-७, ११-३, ११-९; रवी दिक्षित (तामिळनाडू) वि.वि. क्रिश कपुर (पश्चिम बंगाल) १२-१०, ११-६, ११-८; वेलावन सेंथीकुमार (तामिळनाडू) वि.वि. आर्यमान आदिक (महाराष्ट्र) ११-६, ११-८, ९-११, ११-५.(महिला) :मयुरी नमसिवायम (तामिळनाडू) वि.वि. नेहा कुमारी (बिहार) ११-१, ११-१, ११-०; ऐश्वर्या खुबचंदानी वि.वि. मनिषा बिस्त (उत्तराखंड) ११-५, ११-२, ११-२; आकांक्षा साळुंखे (गोवा) वि.वि. शिखा कुमारी (बिहार) ११-०, ११-३, ११-०; सचिका इंगळे (उत्तरप्रदेश) वि.वि. हीना मुझफर (जम्मू-काश्मिर) ११-०, ११-३, ११-०; अद्या अडवानी (दिल्ली) वि.वि. श्वेता बुधिया (झारखंड) ११-०, ११-०, ११-१; लक्ष्य रागवेंद्र (तामिळनाडू) वि.वि. सन्नी मेहता (बिहार) ११-०, ११-२, ११-३, अनन्या मोरे वि.वि. सुश्मिता पानिग्रही (गोवा) ११-७, ११-६, ११-८.