शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपद

By admin | Updated: January 8, 2017 03:52 IST

६२व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राने ५०.३३ गुणांसह सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. केरळचा संघ ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह सांघिक विजेता

पुणे : ६२व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राने ५०.३३ गुणांसह सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. केरळचा संघ ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह सांघिक विजेता ठरला. केरळ एकूण १०९ गुणांची कमाई केली. महाराष्ट्र ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानी, तर तमिळनाडूचा संघ ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह तिसरऱ्या स्थानी राहिला. केव्हीएसचा श्रीशंकर एम. हा स्पर्धेतील मुलांच्या गटातील, तर केरळची अबिता मॅन्युएल ही मुलींच्या गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६२व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे झाल्या.स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्या हस्ते झाले. या वेळी एसजीएफआयचे निरीक्षक गौरव दीक्षित, उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, एसजीएफआयचे कन्हैया गुर्जर, नवनाथ फडतरे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार, वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजानन पाटील, जयकुमार टेंभरे, महेश पाटील, क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, एजीचे अधिकारी शितोळे उपस्थित होते.

क्रॉस कंट्रीत महाराष्ट्राचे वर्चस्वक्रॉस कंट्रीत पहिले तिन्ही क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या मुलींनी वर्चस्व राखले. नाशिकची पूनम सोनुणे हिने ११ मिनिटे ३०.९७ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. सोलापूरच्या कोमल जगदाळेने ११ मिनिटे ३४.३० सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक, तर नाशिकच्या सायली मेंगेने ११ मिनिटे ३६.३० सेकंद अशी वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले. पूनमचे हे वैयक्तिक तिसरे पदक आहे. तिने ५ हजार मीटरमध्ये सुवर्णपदक आणि ३ हजार मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले. सायलीचे हे दुसरे पदक आहे. कोमलला ३ हजार मीटरमध्ये कांस्य, तर ५ हजार मीटरमध्ये कांस्यपदक मिळाले होते.

रझलीनला रौप्यपदकमुंबईच्या रोझलीन लुईस हिला मुलींच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने २४.८० सेकंद अशी वेळ नोंदवली. पश्चिम बंगालच्या राजश्री प्रसादने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिने २४.६८ सेकंद अशी वेळ नोंदवली. राजश्रीने २०१५चा महाराष्ट्राच्या शेरेगरचा २५ सेकंदांचा विक्रम मोडला. तमिळनाडूच्या व्ही. सुबाने (२४.९६ से.) कांस्यपदक मिळविले. रोझलीनने मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले होत. राजश्रीने मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.

महाराष्ट्राच्या मुलांना रिलेत कांस्यमुलांच्या ४ बाय १०० मीटर रिलेत महाराष्ट्राच्या संघाने कांस्यपदक मिळविले. ४२.४० सेकंदतिं त्यांनी शर्यत पूर्ण केली. या संघात भाग्येश साखला, एस. काजीराम परमबील, गुरुनाथ मशिलकर, आॅल्डेन नरोरा यांचा समावेश होता. केरळच्या संघाने ४१.८३ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. तर, तमिळनाडू संघाने ४२.१५ अशी वेळ नोंदवून रौप्यपदक मिळविले. (क्रीडा प्रतिनिधी) हर्षवर्धन भोसलेने केली गुरूंची इच्छा पूर्ण१७ वर्षीय हर्षवर्धन भोसलेने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. त्याने मुलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५३.१२ सेकंद अशी वेळ नोंदवली. त्याने २०१५ मधील केरळच्या जसबीर एम. पी.चा ५३.९० सेकंदांचा विक्रम मोडला. केरळच्या महंमद अनस के. याने (५४.३५ से.) रौप्य, तर कर्नाटकाच्या अक्षयने (५५.३० से.) कांस्यपदक मिळविले. हर्षवर्धनची ही तिसरी राष्ट्रीय शालेय स्पर्धा होती. गेल्या वर्षी केरळ येथे झालेल्या स्पर्धेत त्याने ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक मिळविले होते. हर्षवर्धन सुरुवातीला दादोजी कोंडदेव पुरस्कारविजेते पांडुरंग म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होता. यानंतर त्याने त्यांचा मुलगा आश्लेष यांच्याकडे सरावाला सुरुवात केली. पांडुरंग म्हसकर यांचे एक महिन्यापूर्वीच निधन झाले. हर्षवर्धनने सुवर्णयश मिळवावे, अशी त्यांची इच्छा होती. हर्षवर्धनने हे सुवर्ण आपल्या गुरूंना अर्पण केले.इतर निकाल - मुले : २०० मी. धावणे : महंमद अजमल (केरळ, २१.९८ सेकंद), अमित कुमार यादव (झारखंड, २१.९९), लिबीन शिबू (केरळ, २२.२०).पोल व्हॉल्ट : आश्विन एस. (केरळ, ४.६१ मीटर : स्पर्धा विक्रम), जेसन के. जी. (केरळ, ४.२०), जी. धीना धेयालन (तमिळनाडू, ४.२०)- ८०० मी. धावणे : शंकर (हरियाणा, १ मिनीट ५५.७२ सेकंद), नितीन (दिल्ली, १:५६:१०), सुगंदकुमार सी. व्ही. (केरळ, १:५६:५५)- क्रॉस कंट्री (५ किमी) : अजितकुमार (गुजरात, १६ मिनिटे ४.१६ सेकंद),धमेंद्र कुमार (विद्या भारती, १६:३३:०३) अजित पी. एन. (केरळ, १६:४३:१२). - भालाफेक : अर्शदीप सिंग (पंजाब, ६८.०७ मीटर), अनमोल राणा (उत्तर प्रदेश, ६१. १७), अमित दहिया (हरियाणा, ५९.१२).- गोळाफेक : आशिष भालोथिया (कर्नाटक, १७.३२ मीटर), रामचंद्र (विद्याभारती, १६. ९८), झुबेर मालिका (हरियाणा, १५.७९).- मुली : भालाफेक : रुनजून पेगू (कर्नाटक, ४३.०८ मीटर), एन. हेमामालिनी (तमिळनाडू, ४२.८२), मनप्रीत कौर (पंजाब,४०.२३).- ८०० मीटर धावणे : अबिथा मॅन्युएल (केरळ, २ मिनिटे ०८.५३ सेकंद : स्पर्धा विक्रम), एल.साम्यश्री (तमिळनाडू, २:१३:६९), अंकिता चहल (दिल्ली, २:१५:०६)- ४०० मीटर अडथळा : अनिला व्हेनू (केरळ, १ मिनिटे ४ सेकंद), बिबिशा एम. बी. (कर्नाटक, १:४:८८), अर्षिता (केरळ, १:५:५०).