शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

गुजरातचा कोलकातावर दिमाखदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 23:55 IST

गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलमधील सातवा विजय मिळवताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला ५ गडी राखून नमवले.

कोलकाता : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलमधील सातवा विजय मिळवताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला ५ गडी राखून नमवले. कोलकाताने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना गुजरातने १८ षटकांतच बाजी मारली. यासह गुजरातने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली.इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गुजरातने कोलकाताला ४ बाद १५८ धावांवर रोखण्यात यश मिळवले. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने सहज बाजी मारली. ड्वेन स्मिथ (२७) आणि ब्रेंडन मॅक्युलम (२९) यांनी सावध सुरुवात केल्यानंतर कर्णधार सुरेश रैना (१४) व दिनेश कार्तिक (५१) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने रैनाला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर अ‍ॅरॉन फिंच व कार्तिक यांनी संघाचा विजय निश्चित केला. कार्तिकने विजयी अर्धशतक झळकावताना २९ चेंडंूत ८ चौकार व एका षटकारासह ५१ धावा काढल्या, तर फिंच १० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २९ धावा काढून परतला.तत्पूर्वी, प्रमुख फलंदाज झटपट परतल्यानंतर शाकिब-अल-हसन (नाबाद ६६) आणि युसुफ पठाण (नाबाद ६३) यांनी केलेल्या नाबाद १३४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर कोलकाताने समाधानकारक मजल मारली. प्रवीण कुमारने भेदक मारा करीत कोलकाताला जबर धक्के दिले. रॉबिन उथप्पा (१४), कर्णधार गौतम गंभीर (५), मनीष पांडे (०) व सूर्यकुमार यादव (४) स्वस्तात परतल्याने कोलकाताची ४ बाद २४ अशी केविलवाणी अवस्था झाली. मात्र शाकिब व पठाण यांनी यानंतर गुजरातला आणखी यश मिळू दिले नाही. शाकिबने ४९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६६ धावा फटकावल्या. पठाणने ४१ चेंडूंत ७ चौकार व एका उत्तुंग षटकारासह ६३ धावा चोपल्या. संक्षिप्त धावफलक :कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ४ बाद १५८, शाकिब-अल-हसन नाबाद ६६, युसुफ पठाण नाबाद ६३, प्रवीण कुमार २/१९ पराभूत वि. गुजरात लायन्स : १८ षटकांत ५ बाद १६४, दिनेश कार्तिक ५१, अ‍ॅरॉन फिंच २९, ब्रेंडन मॅक्युलम २९; ब्रॅड हॉग १/१९, आंद्रे रसेल १/२१.