माढा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
अरण : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणार्या शासकीय क्रीडा स्पर्धांच्या तालुकास्तरीय नियोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या उपस्थितीत माढा तालुक्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली माढा जि़प़शाळेत तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक झाली़
माढा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर
अरण : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणार्या शासकीय क्रीडा स्पर्धांच्या तालुकास्तरीय नियोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या उपस्थितीत माढा तालुक्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली माढा जि़प़शाळेत तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक झाली़ यावेळी नव्याने तालुकास्तरीय स्पर्धेसाठी समावेश करण्यात आलेल्या कराटे स्पर्धा ७ व ९ ऑगस्टला तर २० ऑगस्ट रोजी बुद्ध्रिबळ स्पर्धा अरण येथील संत सावता माळी विद्यालय येथे घेण्याचे ठरले़तसेच माढा क्रीडा संकुलावर १० ते ११ ऑगस्टला क्रिकेट स्पर्धा, २० ते २२ ऑगस्टला रोपळे येथील लक्ष्मी पवार विद्यालयात खो-खो स्पर्धा, तसेच माढा येथील क्रीडा संकुलावर ४ ते ५ सप्टेंबरला व्हॉलीबॉल, २ ते ३ सप्टेंबरला तायक्वांदो, ११ ते १३ सप्टेंबरला मैदानी स्पर्धा होतील़ माढा येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात १४ ते १५ सप्टेंबरला योगासन स्पर्धा, २२ ते २३ सप्टेंबरला आर्या पब्लिक स्कूल, कारखाना येथे कबड्डी स्पर्धा, कुर्डू येथील नागनाथ विद्यालय येथे ३० ते ३१ ऑक्टोबरला कुस्ती स्पर्धा होणार आहेत़यावेळी क्रीडाधिकारी जुबेर शेख, अनिल देशपांडे, दत्ता सांगनुरे व तालुक्यातील क्रीडाशिक्षक उपस्थित होते़ क्रीडा स्पर्धा प्रमुख संजय यादव यांनी स्वागत केले़ समन्वयक संजय शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले़फोटोओळी-माढा तालुका क्रीडा संकुलाची पाहणी करताना जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले़ त्यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे, संजय शिंदे, संजय यादव, प्रवीण घाडगे आदी़