शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

Live - बारा षटकात भारताच्या तीन बाद ७७ धावा

By admin | Updated: March 1, 2016 21:42 IST

श्रीलंकेच्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या बारा षटकात तीन बाद ७७ धावा झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मिरपूर, दि. १ - श्रीलंकेच्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या बारा षटकात तीन बाद ७७ धावा झाल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि सुरेश रैना तंबूत परतले आहेत. 
 
११ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. कुलसेकराने त्याला एका धावेवर चंडीमलकरवी झेलबाद केले. त्यानंतर रोहित शर्मा १५ धावांवर कुलसेकराचा बळी ठरला. सुरेश रैनाला शांकाने २५ धावांवर बाद केले. विराट आणि रैनाने तिस-या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. 
 
विराट नाबाद ३१ धावांवर खेळत असून, युवराज सिंग त्याला साथ द्यायला मैदानात आला आहे.  प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने निर्धारीत २० षटकात नऊ बाद १३८ धावा केल्या असून, भारताला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य दिले आहे. कपुगेंदरा ३०, श्रीवर्धने २२ आणि अन्य फलंदाजांच्या छोटया खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला हे लक्ष्य दिले आहे. 
श्रीलंकेकडून कपुगेंदरा आणि श्रीवर्धनमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक ४३ धावांची भागीदारी झाली. भारताकडून बुमराह, पांडया आणि अश्विनने प्रत्येकी दोन आणि नेहराने एक गडी बाद केला. 
श्रीलंकेला सहा धावांवर पहिला तर, १५ धावांवर दुसरा धक्का बसला. सलामीवीर चंडीमल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. नेहराने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर जयसूर्याला तीन धावांवर बुमरहाने धोनीकरवी झेलबाद केले. 
दिलशानला १८ धावांवर पांडयाने अश्विनकरवी झेलबाद केले. संघाच्या ५७ धावा असताना कर्णधार मॅथ्यूज १८ धावांवर बाद झाला. पांडयाने त्याच्या यष्टया वाकवल्या. श्रीवर्धनेला अश्विनने २२ धावांवर रायनाकरवी झेलबाद केले. 
सलग दोन सामने जिंकणा-या भारताचा आज श्रीलंके विरुद्ध तिसरा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
भारतीय संघात अजिंक्य रहाणेऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत असला तरी, दुखापतग्रस्त खेळाडू भारताची चिंता आहे. मागच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवले होते. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुस-या बाजूला श्रीलंकेचा बांगलादेशने पराभव केला होता.