शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मोसमाची विजयी सुरुवात करू

By admin | Updated: September 20, 2016 05:20 IST

न्यूझीलंड संघाच्या फिरकी आणि डावखुऱ्या गोलंदाजांचा व्हिडिओ पाहून आम्ही रणनीती आखली आहे.

कानपूर : ‘‘किवी संघाला कोणत्याही प्रकारे गृहीत धरणार नसून त्यांच्याविरुद्ध पूर्ण क्षमतेनेच खेळणार. न्यूझीलंड संघाच्या फिरकी आणि डावखुऱ्या गोलंदाजांचा व्हिडिओ पाहून आम्ही रणनीती आखली आहे. तसेच, नव्या मोसमाची सुरुवात ग्रीन पार्क येथे विजयाने करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला. ग्रीन पार्क येथे होणारा मालिकेतील पहिला सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील ५००वा कसोटी सामना ठरणार असल्याने, या सामन्यात खेळण्याची संधी मिळत असल्याबद्दल रहाणेने स्वत:ला नशीबवान म्हटले. ग्रीन पार्कविषयी रहाणे म्हणाला, ‘‘येथे मी यापूर्वी अनेकदा खेळलो असून, ही खेळपट्टी अधिकाधिक हळुवार होत आहे. त्यामुळेच पहिल्या दिवशी येथे आमचा संघ कसा खेळतो आणि प्रमुख खेळाडूंची कामगिरी कशी होते हे खूप महत्त्वाचे ठरेल.’’ न्यूझीलंड संघाविषयी रहाणे म्हणाला, ‘‘त्यांचे फिरकी आणि डावखुरे गोलंदाज चांगले असून आम्ही त्यांचा आदर करतो. अनेक गोलंदाजांविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार असल्याने आम्ही त्यांचा व्हिडिओ पाहून रणनीती आखत आहोत. तसेच, डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचा सरावही करीत आहोत. किवी संघाविरुद्ध खास योजना आखल्या असून मैदानावर त्या दिसून येतील.’’ (वृत्तसंस्था)>नव्या मोसमातील हा पहिलाच सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नुकताच झालेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उंचावलेला असून, प्रत्येक खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास आतुर आहे. मात्र, तरीही न्यूझीलंडला आम्ही कमी लेखत नाही.- अजिंक्य रहाणे