शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लिट्टन व मुस्तफिजूरला अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा

By admin | Updated: June 17, 2015 02:02 IST

भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आल्यामुळे यमजान बांगलादेश संघाने समाधान व्यक्त केले आहे.

मिरपूर : भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आल्यामुळे यमजान बांगलादेश संघाने समाधान व्यक्त केले आहे. बांगलादेश संघ तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असून, त्यासाठी अनुभवी खेळाडूंना संंधी देण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळे मुस्तफिजूर रहमान व लिट्टन दास या युवा खेळाडूंसाठी गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत अंतिम संघात स्थान मिळविणे आव्हान ठरणार आहे.बांगलादेश वन-डे सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसी क्रमवारीत अंतिम आठमध्ये स्थान कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. त्यात यशस्वी ठरल्यास त्यांचा २०१७मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जगातील अव्वल ७ संघ व यजमान इंग्लंड या संघांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर आहे. भारताविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गुरुवारी होणार आहे. भारताविरुद्ध कसोटी सामन्यात संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या मुशफिकर रहीमने स्पष्ट केले, की बोटाच्या दुखापतीतून सावरलो असून वन-डे मालिकेत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळण्यास सज्ज आहे. मुशफिकरच्या निर्णयानंतर यष्टिरक्षणाची जबाबदारी तोच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवान गोलंदाजीसाठी तस्कीन अहमद व रुबेल हुसेन पहिली पसंती असतील. वन-डे संघाचा कर्णधार मशरफी मुर्तजा शानदार गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १५१ सामन्यांत १९३ बळी घेतले आहेत. त्यामुळे मुस्तफिजूरसाठी ही मालिका अनुभव घेण्याची संधी असल्याचे निश्चित आहे. लिट्टनला अंतिम संघात स्थान मिळाले, तर तो तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल. रोनी तालुकदार व तमीम इक्बाल डावाची सुरुवात करणार असतील, तर सौम्य सरकारला वन-डाऊन फलंदाजीची संधी मिळू शकते. लिट्टनला संधी मिळाली, तर तो स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. लिट्टनने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात यष्टिरक्षणाव्यतिरिक्त ४४ धावांची शानदार खेळी केली होती. गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळेल किंवा नाही, याची लिट्टनला कल्पना नाही; पण फातुल्लामध्ये मोठी खेळी करता न आल्यामुळे मात्र तो निराश झाला आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात मोहंमद हफीज व शाहीद आफ्रिदी यांना बाद करून मुस्तफिजूरने पदार्पणाच्या लढतीत प्रसिद्धी मिळवली.