शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

धोनीकडून शिकतोय : केदार जाधव

By admin | Updated: June 17, 2017 02:51 IST

उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे गुण हेरुन त्यांना योग्य पैलू पाडण्यात महेंद्रसिंग धोनीचा हातखंडा आहे. धोनी कर्णधार असताना त्याने रवींद्र जडेजाला असेच घडविले होते.

बर्मिंघम : उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे गुण हेरुन त्यांना योग्य पैलू पाडण्यात महेंद्रसिंग धोनीचा हातखंडा आहे. धोनी कर्णधार असताना त्याने रवींद्र जडेजाला असेच घडविले होते. आता तो केदार जाधवला घडवण्यात कर्णधार विराट कोहलीला मदत करीत आहे. केदारनेही आपल्या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय धोनीला देताना धोनीकडून बरेच काही शिकायला मिळत असल्याचे म्हटले आहे.पार्ट टाईम स्पीनर म्हणून काम करताना केदार जाधवने गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात तमिम इक्बाल आणि मुशीफिकूर रहिम यांना बाद करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.केदार म्हणाला, जेव्हापासून मी भारतीय संघात आलोय तेव्हापासून मी धोनीसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा माझा उद्देश असतो. गोलंदाजी कोणत्या टप्प्यावर करायची आहे, हे मला धोनीच्या डोळ्यात पाहून कळते. मी त्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत असतो.कर्णधार कोहलीनेही मान्य केले की, बांगलादेशी फलंदाज इतर फिरकी गोलंदाजांना आरामात खेळत असताना धोनीने केदारकडे चेंडू सोपवण्यास सांगितले. कोहली म्हणाला, अशा अडचणीच्या वेळी मी धोनीला विचारुनच निर्णय घेतो. आम्हा दोघांना त्या वेळी केदार हा योग्य पर्याय वाटला. केदारनेही आमचा निर्णय सार्थ ठरविला. कोहली म्हणाला, केदार हा नेटमध्ये फारशी गोलंदाजी करीत नाही, परंतु फलंदाजांच्या अँगलमधून त्याला कळते की कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी केल्यास फलंदाजाला अडचणीचे ठरू शकते. केदारने कर्णधाराचा विश्वास या सामन्यात सार्थ ठरवला(वृत्तसंस्था)