जयपूर : यजमान जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगच्या बुधवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत बंगळुरू बुल्सवर 36-31 असा विजय साजरा केला. या विजयाबरोबर पँथर्सने 4क् गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. 38 गुणांसह यू मुंबा दुस:या, तर 34 गुणांसह पटना पायरट्स तिस:या स्थानावर विराजमान आहेत.
सुरुवातीपासून दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. राजेश मंडल आणि मनजित चिल्लर यांनी अप्रतिम खेळ करून बुल्सला आघाडी मिळवून दिली. आठव्या मिनिटाला बुल्सने जयपूरवर लोन चढवला. तरीही जयपूरने दमदार खेळ करून पहिल्या हाफर्पयत 2क्-17 अशी अवघ्या तीन गुणांची आघाडी घेतली.
दुस:या हाफमध्ये जयपूरने खेळ उंचावत बुल्सचा प्रत्येक हल्ला चोख परतवला. त्यांच्या या बदललेल्या रणनीतीसमोर बुल्सला काहीच सुचेनासे झाले. मंडल आणि चिल्लर यांच्या चढायाही अपयशी होत होत्या. पँथर्सकडून राजेश नरवाल आणि जसवीर सिंह यांनी झुंज देत विजय निश्चित केला. पँथर्सने 4 लोन चढवले, यात नरवाल (8) आणि जसवीर (6) यांनी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. (वृत्तसंस्था)