रायपूर : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर उमर अकमल (नाबाद 38 धावा, 18 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार), अहमद शहजाद (34 धावा, 33 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) व नासिर जमशेद (26 धावा, 24 चेंडू, 3 चौकार) यांच्या योगदानाच्या जोरावर लाहोर लॉयन्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी व 8 चेंडू राखून पराभव केला आणि चॅम्पियन्स लीग टी-2क् क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीमध्ये विजय मिळविला. या विजयासह लाहोर लॉयन्स संघाने मुख्य फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने सकारात्मक सुरुवात केली.
लाहोर लॉयन्सने मुंबई इंडियन्सचा डाव 7 बाद 135 धावांत रोखला व 18.4 षटकांत 4 गडय़ांच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना लाहोरच्या डावात उमर अकमल (नाबाद 38), अहमद शहजाद (34), नासिर जमशेद (26) व आसिफ रजा (नाबाद 14) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. त्याआधी, गोलंदाजांच्या अचूक मा:याच्या जोरावर लाहोर लॉयन्सने मुंबई इंडियन्सचा डाव 7 बाद 135 धावांत रोखला. गतविजेत्या मुंबईच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यात आदित्य तारेने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. लाहोरतर्फे अयाज चीमा व वहाब रियाज यांनी अनुक्रमे 22 व 31 धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी 2 बळी घेतले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईने मायकल हसीला (28) स्थान दिले. मुंबई इंडियन्सची सुरुवातीला 3 बाद 23 अशी अवस्था झाली होती. चीमाने चौथ्या षटकात सलग दोन बळी घेत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. लेंडल सिमन्स (7 धावा, 14 चेंडू) संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. अंबाती रायडू (3) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मुंबईच्या डावात हरभजन (18) व प्रवीण कुमार (2क्*) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स 2क् षटकांत 7 बाद 135 (आदित्य तारे 37, मायकल हसी 28, प्रवीण कुमार नाबाद 18, हरभजन 18; अयाज चीमा 2-22, वहाब रियाज 2-31, इम्रान अली, आसिफ रजा प्रत्येकी एक बळी) पराभूत विरुद्ध लाहोर लॉयन्स 18.4 षटकांत 4 बाद 139 (उमर अकमल नाबाद 38 , अहमद शहजाद 34 , नासिर जमशेद 26 धावा, आसिफ रजा नाबाद 14; प्रग्यान ओझा
2-18, पोलार्ड व हरभजन प्रत्येकी 1 बळी).
‘नॉर्दर्न’ची ‘सदर्न’वर मात
रायपूर : केन विलियम्सनच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टसने चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेपूर्वी आज, शनिवारी झालेल्या 1क् षटकांच्या पात्रता फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या सदर्न एक्स्प्रेसला सात गडी राखून पराभूत केले. विलियमसनने केलेल्या 29 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर नॉर्दर्न डिस्ट्रिक्टसने 93 धावांचा पाठलाग करताना दहाव्या षटकातील तीन चेंडू बाकी ठेवत, 96 धावा करीत विजय नोंदविला.