शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स स्पर्धेनंतर कुंबळेंच्या नव्या कराराबाबत निर्णय

By admin | Updated: May 11, 2017 20:35 IST

इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि . 11  : इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कुंबळे यांची गतवर्षी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या वेळी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. जूनअखेरीस त्यांचा करार संपणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, कुंबळे यांच्याबरोबरच्या कराराचे नूतनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र चॅम्पियन्सनंतर बीसीसीआयची आमसभा असून त्यात अधिकृत निर्णय घेतला जाईल. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चॅम्पियन्सपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. कुंबळे यांच्या नव्या कराराबाबत मंडळाच्या व्यवस्थापन समितीकडून परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत ही समिती कार्यरत आहे, तोपर्यंत मंडळाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाला या समितीची परवानगी अनिवार्य आहे, असेही मंडळाकडून सांगण्यात आले. कुंबळे यांच्याकडे प्रशिक्षकपद आल्यापासून भारताने पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. २०१६-१७ मध्ये भारताने १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामनेकुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकले आहेत. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध २-०, न्यूझीलंडविरु द्ध ३-०, इंग्लंडविरु द्ध ४-० अशा कसोटी मालिका जिंकल्या. बांगला देशविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीतही भारताला विजय मिळाला होता. फक्त आॅस्ट्रेलियाविरु द्ध पुण्यात झालेल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. अर्थात भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. भारतात झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकांपैकी न्यूझीलंडवर त्यांनी ३-२ अशी मात केली तरइंग्लंडविरु द्ध त्यांना २-१ असा विजय मिळाला. राष्ट्रीय निवड समितीमध्ये फक्त तीनच सदस्यांचा समावेश असून, त्यामुळे येणाऱ्या अडचणींबाबत अनेक राज्य संघटनांनी सीओए प्रमुख विनोद राय यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रणजी स्पर्धेत ससुमारे ३० संघांचा समावेश असून, केवळ तीनच सदस्यांची राष्ट्रीय समिती अपुरी असल्याचे मत अनेक संघटकांनी व्यक्त केले.