पोटरे एलेग्रे : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटात सलामीच्या लढतीत बेल्जियमकडून मात खाणारा अल्जेरिया संघ रविवारी दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेत आपले भाग्य बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, तर रशियाविरुद्ध पहिला सामना बरोबरीत सुटल्यामुळे या लढतीत विजय मिळवून बाद फेरीची आशा कायम राखण्यासाठी दक्षिण कोरिया मैदानात उतरेल़
स्पर्धेत अल्जेरियाला पहिल्या सामन्यात बेल्जियमकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता, तर कोरियाला रशियाविरुद्धच्या पहिल्या लढतीत 1-1 असे समाधान मानावे लागले होत़े स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना संधी आह़े त्यामुळे दोन्हीही संघांत काटय़ाची टक्कर होणार आह़े या गटात सध्या बेल्जियम संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून, कोरिया आणि रशिया प्रत्येकी एका गुणासह दुस:या क्रमांकावर विराजमान आह़े
फुटबॉल विश्वकपमध्ये चौथ्यांदा आपले नशीब अजमावणारा अल्जेरिया संघ वर्ल्डकपमध्ये आतार्पयत पहिल्या फेरीच्या पुढे मजल मारू शकला नाही़ त्यांना या वेळी पहिल्या फेरीच्या पुढे मजल मारायची असेल, तर दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवावाच लागणार आह़े
विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यांत आतार्पयत प्रतिस्पर्धी संघाकडून 11 गोल खाणारा दक्षिण कोरिया संघ अल्जेरिया विरुद्धच्या लढतीत विशेष कामगिरी करण्याची शक्यता नाही़ रशिया विरुद्ध झालेल्या लढतीतही कोरिया प्रभावी खेळ
करू शकला नव्हता़ त्यामुळे अल्जेरियाचे प्रशिक्षक वाहिद हिलालहोदजिक कोरियाच्या कमजोरीचा लाभ घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, यात शंका नाही़
कोरियाचे प्रशिक्षक होंग म्यूंग अल्जेरियाविरुद्धच्या लढतीत आपला मुख्य स्ट्राईकर पार्क चु यंग याला कायम ठेवू शकतात़ किंवा किम शिन वुक आणि ली कियून हो यांना संधी मिळू शकत़े बेल्जियमविरुद्धच्या लढतीत अल्जेरियाच्या सोफियान फेगुली याने गोल नोंदविला होता़ 1986नंतर विश्वचषकात टीमकडून एखाद्या खेळाडूने केलेला हा पहिलाच गोल होता़
4कोरिया आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या 2क्क्2च्या विश्वकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला होता़
4विश्वकपमधील कोरियाची हीच आतार्पयतची सवरेत्कृष्ट कामगिरी आहे.
4जागतिक क्रमवारीत अल्जेरिया संघ 22व्या स्थानावर आह़े