शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता नाइट रायडर्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय

By admin | Updated: April 19, 2016 23:27 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. १९ - कोलकाता नाइट रायडर्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.  किंग्ज इलेव्हन पंजाबनं 139 धावांचं दिलेलं लक्ष्य भेदत कोलकाता नाइट रायडर्सनं निर्भेळ विजय मिळवला आहे. कोलकातानं 6 गडी राखून 17 षटकांत 141 धावा केल्या. उथप्पानं 9 चौकारासह  २८ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. गंभीर 34, पंड्या 12, शाकिब हसन 11, यादव* 11, पठाण*12 रन्स काढत विजय खेचून आणला. पंजाब कढून पटेल आणि शाहूने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.

त्यापुर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट रायडर्ससमोर  २० षटकात १३९ धावांचे लक्ष ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकात आठ बाद १३८ धावा केल्या.  शॉन मार्शने संयमी फलंदाजी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न करत नाबाद ५६ धावा केल्या. 

किंग्ज इलेव्हन पंजाबची तगडी फलंदाजी या सामन्यात अपयशी ठरली. पंजाब संघाची मधली फळी लवकर तंबूत परतली. काईल अ‍ॅबोट नाबाद १२ धावा केल्या, तर मुरली विजय या सामन्यात २६ धावा काढून बाद झाला. मनन व्होरा (८), वृद्धिमान साहा (८), मिलेर (६), ग्लेन मॅक्सवेल (४),  अक्षर पटेल (९), मोहित शर्मा आणि प्रदीप साहू अवघ्या एक धावा काढून बाद झाले. 
 
कोलकाता नाइट रायडर्सकडून गोलंदाज सुनील नारायण आणि मोर्ने मॉर्केल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर युसूफ पठाण, उमेश यादव आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक बऴी घेतले.