शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोहली दहाव्या स्थानावर कायम

By admin | Updated: May 28, 2015 01:31 IST

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पूर्वीप्रमाणेच दहाव्या स्थानावर कायम आहे.

दुबई : इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर १२४ धावांनी मिळवलेल्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्सने आयसीसी टेस्ट प्लेअर रँकिंगमध्ये तिन्ही गटांत उत्तुंग झेप घेतली आहे, तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पूर्वीप्रमाणेच दहाव्या स्थानावर कायम आहे.स्टोक्सने ९२ आणि १0१ धावांची लाजवाब खेळी केली. याशिवाय त्याने अखेर ३८ धावांत ३ गडीही बाद केले. त्यामुळे तो फक्त सामनावीरच ठरला नाही तर त्याला रँकिंगमध्येही लाभ झाला.२३ वर्षीय स्टोक्सने फलंदाजी क्रमवारीत २७ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो ४४व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत त्याने ४ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो ५१ व्या, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने १२ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो आता १३व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडसाठी आणखी एक चांगली बाब म्हणजे त्यांचा उपकर्णधार जो रूट, हा प्रथमच अव्वल पाच फलंदाजांत पोहोचण्यात यशस्वी ठरला. रूटने ९८ आणि ८४ धावांची खेळी केली आणि त्याने ३ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तो आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथपेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकदेखील आपल्या १६२ धावांच्या खेळीमुळे अव्वल २0मध्ये पोहोचला आहे. त्याने ६ क्रमांकांनी प्रगती केली असून, तो १८व्या स्थानी पोहोचला आहे. अन्य फलंदाजांत जोस बटलरने ९ आणि मोईन अलीने १३ स्थानांनी प्रगती करीत अनुक्रमे ५६ आणि ७८व्या स्थानी पोहोचले आहेत.न्यूझीलंडचा केन विलियम्सन पूर्वीप्रमाणेच सहाव्या स्थानावर कायम आहे; परंतु त्याच्या रेटिंग गुणांची संख्या वाढून ८६0 झाली आहे. बीजे वॉटलिंग ३५व्या आणि कोरी अँडरसन ७६व्या स्थानी आहेत.गोलंदाजांच्या यादीत एकही भारतीय गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही. रवीचंद्रन आश्विन १३व्या स्थानावर आहे. अशा प्रकारे तो भारताचा नंबर वन गोलंदाज कायम आहे. आश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी कायम आहे. या यादीत त्याच्या पुढे बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा वर्नोन फिलेंडर आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग प्राप्त केले आहे. तो रंगना हेराथ आणि मिशेल जॉन्सनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. डेल स्टेन अद्यापही गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यानंतर जेम्स अँडरसन आणि रेयान हॅरिस यांचा क्रमांक लागतो. दरम्यान, इंग्लंडने २९ मेपासून हेंडिग्ले येथे सुरू होणारा दुसरा कसोटी सामना जिंकला अथवा तो ड्रॉ ठेवल्यास न्यूझीलंडची चार क्रमांकांनी घसरण होऊन तो सातव्या क्रमांकावर पोहोचेल आणि त्यांच्या जागी इंग्लंड तिसऱ्या स्थानावर येईल. तथापि, न्यूझीलंडने सामना जिंकल्यास तो चौथ्या स्थानी घसरेल आणि भारत तिसऱ्या स्थानावर स्थानापन्न होईल. सध्या भारत आणि न्यूझीलंडचे ९९ असे समान गुण आहेत; परंतु किवी संघ दशांश गणनेनुसार पुढे आहे. (वृत्तसंस्था)इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोहली टॉप टेनमध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्यानंतर मुरली विजय (२४), चेतेश्वर पुजारा (२५) आणि अजिंक्य रहाणे (२६) यांचा क्रमांक लागतो.