शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

केकेआर-डेअरडेव्हिल्स लढत आज

By admin | Updated: April 17, 2017 01:29 IST

गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला आज, सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

नवी दिल्ली : गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला आज, सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोन विजय मिळवणाऱ्या दिल्ली संघाचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्यानिमित्ताने रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल. केकेआरने गुजरात लायन्सविरुद्ध विजय मिळवत यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने किंग्ज इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली. दुसऱ्या बाजूचा विचार करताना सलामी लढतीत रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागणाऱ्या दिल्ली संघाने त्यानंतर सलग दोन विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. दिल्ली संघाला या वेळी गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल, पण स्पर्धेत आतापर्यंत सर्वांत प्रभावी भासत असलेल्या केकेआर संघाला पराभूत करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान राहील. केकेआर संघाच्या विजयात आॅरेंज कॅपचा मानकरी व कर्णधार असलेल्या गौतम गंभीरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. संघाला ख्रिस लीनची उणीव भासत असली तरी उथप्पा, पांडे व युसूफ पठाण यांच्या समावेशामुळे संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. कुलदीप यादव, सुनील नरेन व पठाण या तीन फिरकीपटूंसह उमेश यादव, ख्रिस व्होक्स व ट्रेंट बोल्ट या केकेआरची वेगवान गोलंदाजांमुळे गोलंदाजीची बाजू बळकट आहे. (वृत्तसंस्था)दिल्ली संघाची भिस्त यंदाच्या मोसमातील एकमेव शतकवीर संजू सॅम्सन, सॅम बिलिंग्स, ऋषभ पंत, कोरी अँडरसन व ख्रिस मॉरिस यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. गोलंदाजीमध्ये कर्णधार झहीरसह ख्रिस मॉरिस, शाहबाज नदीम, पॅट कमिन्स हे चांगले फॉर्मात आहेत.