शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कांगारूंच्या शिकारीचं बक्षीस, प्रत्येक खेळाडूला 50-50 लाख

By admin | Updated: March 28, 2017 19:28 IST

धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली. मालिका विजयाचं बक्षिस म्हणून...

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली.  मालिका विजयाचं बक्षीस म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रूपये देण्याची घोषणा केली. याशिवाय मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना 25 लाख आणि अन्य सपोर्ट स्टाफला 15 लाख रूपये देण्याची घोषणा बीसीसीआयने केली. 
 
यापुर्वी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून टीम इंडियाला 10 लाख डॉलरचं बक्षीस देण्यात आलं आहे.  1 एप्रिल 2017 पर्यंत जो संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असेल त्याला आयसीसीकडून बक्षीस देण्यात येतं. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर भारताचं क्रमांक एकचं स्थान अधिक बळकट झालं. त्यानुसार आयसीसीने टीम इंडियाला 10 लाख डॉलरचं बक्षीस दिलं. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, 2015 पासून ही रक्कम 10 लाख डॉलर इतकी करण्यात आली.
 
 2016-17 च्या मोसमात भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताने या मोसमात एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. भारताने न्यूझीलंडला 3-0 आणि इंग्लंडला 4-0 ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही भारताने 208 धावांनी विजय मिळवला होता.