शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

ज्वाला-आश्विनी जोडीला विजेतेपद

By admin | Updated: June 30, 2015 02:07 IST

ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने येथे ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या कॅनडा ओपन ग्रांप्रीच्या निर्णायक लढतीत इफ्जे मुस्केरन्स आणि सेलेना पीक

कॅलगेरी : ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने येथे ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या कॅनडा ओपन ग्रांप्रीच्या निर्णायक लढतीत इफ्जे मुस्केरन्स आणि सेलेना पीक या डच जोडीला सरळ सेट्समध्ये पराभूत करताना महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.तृतीय मानांकित भारतीय जोडीने ३५ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी जोडी १९-१९ बरोबरीवर होती. या वेळी एकमेव गेम पॉइंटचा फायदा घेत त्यांनी पहिला गेम जिंकला. पहिल्या गेममध्ये आघाडी मिळवल्यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये शानदार कामगिरी केली आणि लवकरच १५-६ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मुस्केन्स आणि पीक जोडीने जबरदस्त मुसंडी मारताना ९ गुण प्राप्त करीत स्कोअर १५-१५ असा बरोबरीत केला; परंतु भारतीय जोडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व ठेवताना पुढील सातपैकी ६ गुण जिंकताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.लंडन आॅलिम्पिक २0१२ नंतर पुन्हा एकदा ज्वाला आणि आश्विनीबरोबर खेळणे सुरू केल्यानंतर या जोडीचे हे पहिलेच विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)आत्मविश्वास उंचावणारा विजय : आश्विनीनवी दिल्ली : ज्वाला गुट्टाच्या साथीने कॅनडा ओपनमध्ये महिला दुहेरीत विजेतेपद मिळवल्यानंतर उत्साह वाढलेली भारतीय स्टार बॅडमिंटन खेळाडू आश्विनी पोनप्पा हिने दोघांच्या कामगिरीतील सातत्य हे यशाचे गुपित असून, या विजयामुळे आॅगस्ट महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेआधी आत्मविश्वास उंचावणारी बाब असल्याचे म्हटले आहे.आश्विनी म्हणाली, ‘‘हा शानदार विजय आहे. आम्ही चांगले खेळलो आणि आमच्या कामगिरीत सातत्य राहिले. विश्व चॅम्पियनशिपच्या उंबरठ्यावर विजेतेपद जिंकणे ही बाब आत्मविश्वास उंचावणारी आहे. स्वाभाविकपणे आॅगस्ट महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिप हे आमचे पुढील लक्ष्य आहे.’’