शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा

By admin | Updated: December 13, 2014 14:48 IST

अंजुमन स्कूलने जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी नागपूर माध्यमिक स्कूलचा ६-० ने धुव्वा उडवित एकतर्फी विजयाची नोंद केली.

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धाअंजुमन स्कूलचा एकतर्फी विजयनागपूर : अंजुमन स्कूलने जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी नागपूर माध्यमिक स्कूलचा ६-० ने धुव्वा उडवित एकतर्फी विजयाची नोंद केली. एनडीएफएद्वारे आयोजित या स्पर्धेतील सामने मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर खेळविण्यात येत आहेत. लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड हे पुरस्कर्ते आहेत. विजयी घोडदौड कायम राखणाऱ्या अंजुमन संघाने आजही प्रारंभीपासून वर्चस्व गाजविले. चौथ्या मिनिटाला मोहम्मद इकराम याने खाते उघडले. झियाऊर रहमानने पुढच्या क्षणाला आघाडी दुप्पट केली. अंजुमनचा तिसरा गोल शेख फरदीन याने १४ व्या मिनिटाला नोंदविला.मध्यंतरापर्यंत विजयी संघाकडे ३-० अशी आघाडी होती.मध्यंतरातील खेळात आणखी तीन गोल झाले. ३५ व्या मिनिटाला शेख शाहीद याने तर पुढच्या क्षणाला मो. इकरामने गोल केला. ४५ व्या मिनिटाला अनिस अन्सारी याने संघाचा सहावा गोल नोंदविला.हुसामिया हायस्कूलने के. जॉन पब्लिक स्कूलला पुढे चाल दिली. अन्य एका सामन्यात सेंट ॲन्नेस स्कूलने गुरुनानक स्कूलचा १-० ने पराभव केला. दानिश अंजनकर याने १२ व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.सेंट जोन्स हायस्कूलने प्रहार विद्यालयाला ५-० ने लोळविले. आबिद शेख याने ११ व्या, रुपेश आत्राम १२, दिव्यांशू, ३१ व्या, मोहित अग्रवाल ३५ व्या आणि पृथ्वी मानकर याने ३६ व्या मिनिटाला गोल केला.उद्या शनिवारी सकाळी ८ पासून एसएफएसविरुद्ध सेंटर पॉईंट स्कूल वर्धमाननगर, सेंट मायकेल हायस्कूलविरुद्ध सीपीएस दाभा, एमएम रब्बानी हायस्कूल कामठीविरुद्ध गुरुनानक स्कूल, सेंट जॉन्स स्कूलविरुद्ध राजेंद्र हायस्कूल आणि भवन्स श्रीकृष्ण नगरविरुद्ध राजेंद्र हायस्कूल हे सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी)