शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

जपान उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 24, 2015 23:31 IST

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जपानने नेदरलँडला २-१ नी पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साओरी अरियोशी व मिजुहो साकागुची यांनी

वैंकुवर : महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जपानने नेदरलँडला २-१ नी पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साओरी अरियोशी व मिजुहो साकागुची यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. आता येत्या शनिवारी जपानची लढत एडमंटमध्ये आॅस्ट्रेलियाशी होईल. जपानने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळविले. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला अरियोशी हिने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जपानने जोरदार आक्रमण करून आपली भूमिका स्पष्ट केली. मध्यंतराला जपानने गोल करण्याच्या काही संधी दवडल्या. सामन्याच्या २२व्या मिनिटाला सामेशिमा हिने गोलपोस्टच्या जवळून मारलेला चेंडू गोलजाळ्यावरून गेला. मध्यंतरापूर्वी शिनोबू आन्हो हिनेदेखील गोल करण्याची चांगली संधी निर्माण केली होती. मात्र, त्या संधीचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. उत्तरार्धात ६७व्या मिनिटाला सकागुची हिनेदेखील आक्रमण करून गोलची संधी निर्माण केली. मात्र, नेदरलँडच्या गोलरक्षकाने ही संधी विफल केली.त्यानंतर सामन्याच्या ७८व्या मिनिटाला मिडफिल्डर सकागुची हिने गोल करून संघाची आघाडी २-०ने वाढविली. सामन्याच्या ७६व्या मिनिटाला नेदरलँडने जपानच्या गोलजाळ्याच्या दिशेने आक्रमण करून मुसंडी मारली. मात्र, गोलरक्षक अयुमी काइहोरी हिने वान डि वेन हिने मारलेला चेंडू अडवून गोल करण्याची संधी हाणून पाडली. त्यानंतर वान डि वेन हिनेच इंज्युरी टाइममध्ये गोल करून संघाची आघाडी १-२ अशी कमी केली. मात्र, तोपर्यंत सामना नेदरलँडच्या हातून निसटून गेला होता. येत्या शनिवारी जपानला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी आॅस्ट्रेलियाशी झुंजावे लागेल. त्यापूर्वी शुक्रवारी मँट्रीयल येथे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जर्मनी व तिसऱ्या स्थानी असलेल्या फ्रान्स संघांत लढत होईल. तर, ओटावामध्ये चीनची लढत आॅलिम्पिकविजेत्या अमेरिका संघाशी होणार आहे. शनिवारी यजमान कॅनडा व इंग्लंडची लढत वैंकुवरमध्ये होईल.