शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जपानची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: July 3, 2015 04:24 IST

विद्यमान विश्वविजेते जपानने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम आगेकूच करताना इग्लंडचे कडवे आव्हान २-१ असे परतावून लावत फिफा महिला विश्वचषक

एडमंटन : विद्यमान विश्वविजेते जपानने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम आगेकूच करताना इग्लंडचे कडवे आव्हान २-१ असे परतावून लावत फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. रविवारी विजेतेपदासाठी जपानचा सामना बलाढ्य अमेरिकेविरुद्ध होईल.कॉमनवेल्थ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी तोडिस तोड खेळ करताना सामना चुरशीचा केला. जपानने अनेकदा गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र इग्लंडच्या भक्कम बचावापुढे निभाव न लागल्याने त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यातच इगलंडने देखील आक्रमक पवित्रा घेताना सामन्यात रंग भरले. यावेळी ३३व्या मिनिटाला जपानची कप्तान अया मियामा हिने अप्रतिम गोल करताना संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर लगेच सात मिनिटांनंतर इग्लंडने देखील बरोबरी साधताना शानादार पुनरागमन केले. फारा विलियम्सने पेनल्टी कॉर्नरची संधी साधताना गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.मध्यंतराला सामना बरोबरीत राहिल्यानंतर दोन्ही संघांनी सावध भूमिका घेताना धोका शक्यतो टाळला. निर्धारीत वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर घेण्यात आलेल्या अतिरीक्त वेळेमध्ये नेमका घोळ झाला. अतिरीक्त वेळेच्या दुसऱ्याच मिनिटाला इग्लंडची बचावपटू लाउरा बासेट हिने ९०+२ मिनिटाला स्वयंगोल करताना जपानच्या विजयात हातभार लावला. या एका चुकीमुळे पहिल्यांदा विश्वचषक अंतिम फेरी गाठण्याचे इंग्लंडचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. तर जपानने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठल्याचा जल्लोष केला. (वृत्तसंस्था)