शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जगजितचा अफलातून खेळ; भारत उपांत्य फेरीत

By admin | Updated: July 2, 2015 02:57 IST

ड्रॅगफ्लिकर जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने

एंटवर्प : ड्रॅगफ्लिकर जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाचा ३-२ गोलनी पराभव करून उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित तर केलीच; पण अझलान शाह हॉकी स्पर्धेतील पराभवाचा वचपासुद्धा काढला. सतबीरसिंगने तिसऱ्या मिनिटाला गोल करून भारताला १-० गोलची आघाडी मिळून दिली होती. नंतर मलेशियाच्या राजिया रहिमने गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर २३व्या मिनिटाला त्यांच्या शाहारील सबाहने गोल करून मलेशियाला २-१ अशी आघाडी मिळून दिली. भारतीय आघाडीच्या फळीने अनेक व्यूहरचना रचून गोल करण्यापर्यंत प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिकर जगजितने गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेचच भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळीसुद्धा जगजितने कोणतीही चूक न करता मलेशियाच्या गोलरक्षकाला चकवून आपल्या संघाचा तिसरा गोल केला. ही ३-२ गोलची आघाडी समना संपेपर्यंत राहिली. ८ एप्रिल रोजी अझलान शाह स्पर्धेत मलेशियाने भारताला ३-२ गोलनी नमविले होते. या विजयामुळे भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढला.