शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जडेजाचे पुनरागमन, रैनाला वगळले

By admin | Updated: December 20, 2015 02:55 IST

फार्मात असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याचे बक्षीस मिळाले असून, आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचे भारतीय वन-डे संघात

नवी दिल्ली : फार्मात असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याचे बक्षीस मिळाले असून, आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचे भारतीय वन-डे संघात पुनरागमन झाले. आयपीएलच्या नवव्या पर्वासाठी १२.५ कोटी रुपयांमध्ये राजकोट संघासाठी करारबद्ध झालेला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला वन-डे संघातून वगळण्यात आले. भारतीय संघातील तीन अनुभवी, दिग्गज युवराज सिंग, आशिष नेहरा आणि हरभजन सिंग यांची आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० संघात निवड करण्यात आली. बीसीसीआयच्या सिनीअर निवड समितीची शनिवारी जवळजवळ दोन तास रंगलेल्या बैठकीनंतर संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले. निवड समितीने संघाच्या निवडीबाबतच्या सर्व शक्यता चुकीच्या ठरवल्या. या बैठकीला भारताचा वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपस्थित होता. भारतीय संघ १२ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात पाच वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.विजय हजारे करंडक स्पर्धेत ३४ वर्षीय युवराज सिंगने पाच सामन्यांत ८५.२५ च्या सरासरीने आणि १०३.६४ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा फटकावल्या. युवराजच्या कामगिरीच्या जोरावर पंजाब संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. युवराजने भारतीय संघातर्फे अखेरचे प्रतिनिधित्व ढाका येथे विश्व टी-२० अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध केले होते. नेहराचे पुनरागमन आश्चर्यचकित करणारे आहे. नेहराने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०११ मध्ये खेळला होता, पण टी-२० क्रिकेटमध्ये विशेषत: आयपीएलच्या आठव्या पर्वात त्याने चमकदार कामगिरी करीत निवड समितीचे लक्ष वेधले. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावर निवड समितीने विश्वास दाखविला आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे वन-डे व टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात शमी दुखापतग्रस्त झाला होता. शमी यंदा आॅस्ट्रेलियात झालेल्या विश्वकप स्पर्धेत अखेरची आंतरराष्ट्रीय लढत खेळला होता. वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचे वन-डे संघात पुनरागमन झाले आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात मनीष पांडे, बरेंदर शरण आणि हार्दिक पांड्या यांच्या रूपाने तीन नवे चेहरे आहेत. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला वन-डे संघातून वगळले, पण त्याला टी-२० संघात स्थान दिले आहे.भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला वन-डे सामना १२ जानेवारी रोजी पर्थमध्ये खेळणार आहे. दुसरा वन-डे १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेनमध्ये, तिसरा वन-डे १७ जानेवारी रोजी मेलबोर्नमध्ये, चौथा वन-डे २० जानेवारी रोजी कॅनबरामध्ये, तर पाचवा वन-डे २३ जानेवारी रोजी सिडनीमध्ये खेळणार आहे. तीन टी-२० सामने २६, २९ आणि ३१ जानेवारी रोजी अनुक्रमे अ‍ॅडिलेड, मेलबोर्न आणि सिडनीमध्ये होतील. वन-डे संघमहेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव, गुरकिरत सिंगमान, ऋषी धवन आणि बरेंदर शरण. इन :मनिष पांडे, रवींद्र जडेजा, ऋषी धवन, महंमद शामी, ईशांत शर्मा, बरेंदर सरन.आऊट :सुरेश रैना, अंबाती रायुडू, अमित मिश्रा, स्टुअर्ट बिन्नी, एस. अरविंद, मोहित शर्मा (दुखापतग्रस्त), हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमारटी-२० संघमहेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, सुरेश रैना, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हरभजन ंिसंग, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार व आशिष नेहरा. आऊट :एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, मोहित शर्मा (दुखापतग्रस्त)