शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात फुटबॉल संघ उभारणे कठीण

By admin | Updated: June 27, 2017 00:47 IST

भारतात विविध वयोगटात सातत्यपूर्ण प्रक्रिया राबविली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या काही

नवी दिल्ली : भारतात विविध वयोगटात सातत्यपूर्ण प्रक्रिया राबविली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या काही दिवसांआधी संघ उभारणी करणे फारच कठीण असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले आहे.देशात खेळाडूंचा प्रवाह येताना दिसत नाही. यामुळेच विविध वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंची फळीदेखील तयार होताना दिसत नाही, असे मत नोंदवीत कॉन्स्टेनटाईन पुढे म्हणाले, ‘खेळाडूंमध्ये समन्वय निर्माण होण्यास या बाबी आवश्यक आहेत. पण आवश्यक बाबींवर भर दिला जात नसल्यामुळे स्पर्धेच्या काही दिवसांआधी विविध प्रदेशातील खेळाडूंचा एकत्र सरावदेखील घेणे कठीण होऊन बसले आहे. भारताच्या २३ वर्षांखालील संघातील खेळाडूंनी काही दिवसांआधी एकत्र सराव सुरू केला आहे. पुढील महिन्यात कतारमध्ये होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी संघबांधणी करायची असल्याने आम्ही डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये राष्ट्रीय संघाचा सराव सुरू केला. तथापि, विविध राज्यांतील खेळाडूंना समन्वय साधण्यास पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे.’भारतीय सीनियर संघाने आशियाई पात्रता फेरीत १३ जून रोजी किर्गिस्तानवर १-० ने विजय नोंदविल्यापासून विश्रांतीचा निर्णय घेतला. त्यामुळे कॉन्स्टेनटाईन हे २३ वर्षांखालील संघाकडे अधिक लक्ष देत आहेत. भारताचा सिरिया, तुर्कमेनिस्तान आणि यजमान कतारसोबत एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘जी मुले माझ्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत, त्यांना सामन्यादरम्यान त्रास होऊ शकतो, कारण सर्व मुलांनी दहा दिवस आधीपासून सराव सुरू केला. आमच्या गटातील सर्व संघ आणि आमच्या संघात मोठी तफावत आहे. भारत वगळता सर्वच संघातील खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून सोबत सराव करीत आहेत. आमच्याकडे १७, १९ आणि २३ वर्षांखालील खेळाडूंची फळी निर्माण करणारी कुठलीही प्रक्रिया नाही. भारतीय संघातील काही खेळाडू १९ वर्षांखालील संघात खेळले आहेत; पण सर्वांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो. तथापि, पराभव पत्करण्यासाठी आम्ही जाणार नाही. काही आठवड्यांत संघ सज्ज करणे कठीण असले, तरी आम्ही सामन्यागणिक विजय मिळविण्यावर भर देणार आहोत. देशातील २८-३० मुलांना एकत्र आणून संघ तयार करणे फारच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ताण असला तरी आम्ही संघ उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)