शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

आयर्लंड बचावला

By admin | Updated: March 8, 2015 01:46 IST

आयर्लंडने रोमहर्षक लढतीत शनिवारी झिम्बाब्वेला अवघ्या पाच धावांनी पराभूत करीत विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलच्या चढाओढीत स्वत:ला कायम राखले.

होबार्ट : आयर्लंडने रोमहर्षक लढतीत शनिवारी झिम्बाब्वेला अवघ्या पाच धावांनी पराभूत करीत विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलच्या चढाओढीत स्वत:ला कायम राखले.आयर्लंडने प्रथम फलंदाजी करीत विश्वचषकातील सर्वोच्च ८ बाद ३३१ धावांची नोंद केली. एड जॉयसने ११२ आणि अ‍ॅण्डी बालबर्नी याने ९७ धावांचे योगदान दिले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. झिम्बाब्वेकडून कर्णधार ब्रँडन टेलर याने १२१, तसेच सीन विलियम्सने ९६ धावा ठोकल्या. पण पाच धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे विजयापासून वंचित राहिला. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅलेक्स कुसाक याने अखेरच्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर दोन गडी बाद करीत झिम्बाब्वेला स्पर्धेबाहेर केले. झिम्बाब्वेची एक वेळ ४ बाद ७४ अशी अवस्था झाली होती, पण टेलर-विलियम्स यांनी पाचव्या गड्यासाठी १४९ धावा ठोकून सामन्यात चुरस आणली. टेलरला कुसाकने ३८ व्या षटकात बाद केल्यानंतरही विलियम्सने एकाकी झुंज दिली. तो ४७ व्या षटकात अखेरच्या चेंडूवर केविन ओब्रायनचा बळी ठरला. रेजिस चाकब्वा १७ आणि तवांडा मुपारिवा १८ यांनी आशा पल्लवित केल्या. त्या वेळी अखेरच्या षटकात सात धावांची गरज होती. कुसाकने पहिल्या चेंडूवर चाकब्वाची दांडी गुल केली. मुपारिवाचा झेल कर्णधार विलियम्स पोर्टरफिल्डने टिपताच झिम्बाब्वेची आशा संपली. त्याआधी जॉयसच्या शतकामुळे आयर्लंडने सर्वाधिक धावा उभारल्या. बालबर्नी कर्णधार ब्रँडन टेलरच्या फेकीवर झेलबाद होताच शतकापासून वंचित राहिला. जॉयस - बालबर्नी यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३८ धावा उभारून धावसंख्येला आकार दिला. बालबर्नीने ७८ चेंडू टोलवित सात चौकार आणि चार षटकार मारले. गॅरी विल्सनने १३ चेंडंूत तीन चौकार आणि एका षटकारासह २५ धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)५०० धावांचा टप्पा विश्वचषकात पार करणारा एड जोएसे हा असोसिएट संघातील चौथा फलंदाज आहे. जोएसेने ५५१ धावा केल्या आहेत. केनियाचा स्टीव्ह टिकोलो (७६८) आयर्लंडचा निल ओब्रायन (५३१) आणि केनियाचा रवी शाह (५००) यांनी हा टप्पा पार केला आहे.०३ फलंदाजांनी आयर्लंडकडून वर्ल्डकपमध्ये शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. आज जोएसेने ११२ धावा केल्या. यापूर्वी जेर्मी ब्रे आणि केव्हीन ओब्रायन यांनी शतके केली आहेत. ० वेळा यापूर्वी असोसिएट देशाने झिम्बाब्वेविरुद्ध तीनशेचा आकडा पार केला आहे. केनियाची ९ बाद २८५ ही त्यांच्याविरुद्धची सर्वोत्तम धावसंख्या होती.१ वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेकडून शतक झळकावणारा ब्रेंडन टेलर हा एकमेव कर्णधार आहे.आयर्लंड : विलियम पोर्टरफिल्ड झे. मस्कद्जा गो. विलियम्स २९, पॉल स्टर्लिंग झे. विलियम्स गो. पनयंगारा १०, एड जोएसे झे. इर्वान गो. चतारा ११२, अ‍ॅण्डी बालबिर्नी धावबाद ९७, केविन ओब्रायन झे. चकाब्वा गो. चतारा २४, गॅरी विल्सन झे. चकाब्वा गो. विलियम्स २५, जॉन मूनी त्रि. गो. विलियम्स १०, नील ओब्रायन झे. पनयंगारा गो. चतारा २, जॉर्ज डॉकरेल नाबाद ५, अ‍ॅलेक्स कुसाक नाबाद २, अवांतर : १५, एकूण : ५० षटकांत ८ बाद ३३१ धावा. गोलंदाजी : पनयंगारा ९-०-६९-१, चतारा १०-०-६१-३, मुपारिवा १०-०-५६-०, रझा ९-०-५१-०, विलियम्स ९-०-७२-३, मस्कद्जा ३-०-१८-०.झिम्बाब्वे : चिभाभा गो. पोर्टरफिल्ड गो. कुसाक १८, एस. रझा झे. स्टर्लिंग गो. मूनी १२, एस. मायरे झे. कुसाक गो. डॉकरेल ११, मस्कद्जा, विल्सन गो. ओब्रायन ५, ब्रँडन टेलर झे. ओब्रायन गो. कुसाक १२१, एस. विलियम्स झे. मूनी गो. के. ओब्रायन ९६, सी. इर्विन झे. एन. ओब्रायन गो. मक्ब्रायन ११, आव. चकाब्वा त्रि. गो. कुसाक १७, टी. पनयंगारा झे. पोर्टरफिल्ड गो. मूनी ५, टी. मुपारिवा झे. पोर्टरफिल्ड गो. कुसाक १८, टी. चतारा नाबाद १, अवांतर : ११, एकूण : ४९.३ षटकांत सर्व बाद ३२६ धावा. गोलंदाजी : कुसाक ९.३-२-३२-४, मूनी १०-०-५८-२, के. ओब्रायन १०-०-९०-२, डॉकरेल १०-०-५६-१, मॅक्ब्रायन ८-०-५६-१, स्टर्लिंग २-०-२६-०.