शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

IPL10 - वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी

By admin | Updated: May 21, 2017 05:36 IST

भारताचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे आयपीएलच्या दहाव्या सत्रात न खेळणे वॉशिंग्टन सुंदरच्या पथ्यावर पडले. त्याने या अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेतला

- ऑनलाइन लोकमत
 
भारताचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे आयपीएलच्या दहाव्या सत्रात न खेळणे वॉशिंग्टन सुंदरच्या पथ्यावर पडले. त्याने या अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आणि स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने आतापर्यंत १० सामन्यात ८ बळी घेतले आहेत. मुंबई विरोधात त्याने ३ बळी घेत पुण्याला अंतिम फेरीत पोहचवले. आयपीएलच्या आधी रायजींग पुणे सुपरजायंट्सकडून खेळणार होता. मात्र दुखापत आणि सातत्याने क्रिकेट खेळल्याने त्याला डॉक्टरांनी विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तो या सत्रात खेळू शकला नाही. त्याऐवजी पुण्याकडून दक्षीण अफ्रिकेचा स्टार गोलंदाज इम्रान ताहीर खेळला आणि त्याच्या जोडीला संघात तामिळनाडूच्या सतरा वर्षांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करणाºया वॉशिंग्टन सुंंदर याचा समावेश करण्यात आला. सुंदरनेही आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सत्रात संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही.  हैदराबाद विरोधात पहिला सामना खेळणाºया सुंदरला पहिला बळी दुस-या सामन्यात मिळाला. या सत्रात त्याने मुंबई इंडियन्स विरोधात पहिल्या सामन्यात १ तर क्वालिफायर १ मध्ये तीन बळी घेतले आहेत. सत्रातील आठ पैकी चार बळी त्याने मुंबई विरोधात घेतले.  केकेआर विरोधातील सामन्यात त्याने गंभीर आणि जॅक्सन यांना बाद करत केकेआरला चांगलेच बॅकफुटवर ढकलले होते.
भारताच्या १९ वर्षेआतील संघाकडून खेळताना सुंदरने केलेली कामगिरी प्रभावी होती. तो नेहमीच चांगल्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करतो. १९ वर्षे आतील वर्ल्ड कप अंतिम सामन्यात त्याने ९ षटकांत फक्त १८ धावा दिल्या होत्या. आपल्या प्रभावी कामगिरीमुळेच त्याने पुण्याला इम्रान ताहीरची अनुपस्थिती जाणवू दिलेली नाही.