शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

IPL - विराट कोहली बाहेर? या खेळाडूकडे RCBचे नेतृत्व

By admin | Updated: March 31, 2017 14:26 IST

कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या सत्रातील सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटीत झालेल्या दुखापतीनंतर विराट कोहलीने धर्मशाला कसोटीतून माघार घेतली होती. कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या सत्रातील सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत एबी डीव्हिलियर्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे. येत्या 5 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध खेळविण्यात येणार आहे.कोहलीच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सुरूवातीचे काही सामन्यांना कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. विराट कोहलीच्या जागेवर सर्फराज खान किंवा मनदीप सिंगला अंतिम 11 मध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.
 
विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प 
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने मागितली माफी 
ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री शक्य नाही - विराट कोहली
 
2 एप्रिल रोजी डीव्हिलियर्स भारतात येणार आहे. सध्याची परिस्थीती पाहता तो आरसीबीचे नेतृत्व करु शकतो. संघ व्यवस्थापकाकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही. पण आरसीबीकडे शेन वॅटसन आणि डीव्हिलियर्स सारखे पर्याय आहेत. जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमुळे बीसीसीआय विराट कोहलीला आराम करायला सांगू शकते. त्याची दुखापत पूर्णपणे ठीक होत नाही तो पर्यंत तो संघाबाहेरच राहू शकतो.
(पराभवानंतर स्मिथची अजिंक्य रहाणेला "बिअर" ऑफर) 
(...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली)