शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलसाठी संघात शुक्रवारी परतणार

By admin | Updated: May 13, 2015 23:17 IST

इंग्लंड संघात पुनरागमनाची आशा मावळल्यानंतर आक्रमक फलंदाज केविन पीटरसन याने आयपीएल-८ च्या प्ले आॅफ दौडीआधी हैैदराबाद सनरायझर्समध्ये परतण्याची तयारी चालविली आहे.

लंडन : इंग्लंड संघात पुनरागमनाची आशा मावळल्यानंतर आक्रमक फलंदाज केविन पीटरसन याने आयपीएल-८ च्या प्ले आॅफ दौडीआधी हैैदराबाद सनरायझर्समध्ये परतण्याची तयारी चालविली आहे.अ‍ॅशेस मालिकेआधी इंग्लंड संघात स्थान मिळेल, अशी पीटरसनला आशा होती. कौंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळताना लिसेस्टरशायरविरुद्ध तिहेरी शतक ठोकल्यानंतर केविन अधिकच आशावादी होता; पण ईसीबीचे नवे संचालक अ‍ॅण्ड्र्यू स्ट्रॉस यांनी ‘अविश्वासू खेळाडू’ असे संबोधून पीटरसनच्या परतण्याचा मार्ग बंद केला. ईसीबीची सृूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत स्ट्रॉस यांनी पीटरसनच्या पुनरागमनाचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगितले. आम्ही त्याच्यावर कुठलीही बंदी घातलेली नाही; मात्र तो संघात परतेलच, याची खात्री देऊ शकत नाही, असेही त्यांनी बजावले.दुसरीकडे, पीटरसननेदेखील ईसीबीवर तोंडसुख घेतले. तो म्हणाला, ‘‘माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. संघात पुनरागमनाची संधी असल्याचे सांगून माझी दिशाभूल करण्यात आली. मी कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी आयपीएलच्या कराराकडे दुर्लक्ष केले. सरेकडे मला देण्यासाठी पैसे नव्हते, तरीही मी त्यांच्या संघाकडून खेळलो. मला संधी मिळणार नाही, याची कल्पना आली होती.’’ बंगळुरूत झालेल्या लिलावाच्या वेळी सनरायझर्स दोन कोटी देणार होते; पण कौंटी खेळण्यासाठी त्या वेळी सरेला प्राधान्य दिले. आता पुन्हा सनरायझर्सकडून खेळू इच्छितो.आयपीएल करारानुसार खेळाडूंना रिलीज करण्याच्या समझोत्याअंतर्गत स्पर्धेसाठी मला परत बोलावण्याचा सनरायझर्सला अधिकार आहे. सनरायझर्स प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या स्थितीत आहे. संघ व्यवस्थापनाने पीटरसनच्या पुनरागमनाबद्दल कुठलाही शब्द दिलेला नाही; पण डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी पीटरसन फारच उत्सुक आहे, याबद्दल शंका नाही. (वृत्तसंस्था)