शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल स्पॉट फिक्सिंग : श्रीसंतसह सर्व खेळाडू दोषमुक्त

By admin | Updated: July 25, 2015 17:26 IST

आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला या तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पुरेशा पुराव्यांअभावी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्या तिघांना दोषमुक्त केले आहे. पतियाळा हाऊस कोर्टामध्ये या प्रकरणाची आज दुपारी सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय झाला.

आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंग करण्याच्या आरोपाखाली मे २०१३मध्ये अटक केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी या तीन क्रिकेटपटूंविरुद्ध तांत्रिक आधारावर न्यायालयात अद्याप आरोप निश्चित होऊ शकले नाहीत.

दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर २०१३मध्ये श्रीसंत व चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घातली, तर चंदिलाचे प्रकरण बोर्डाच्या शिस्तपालन समितीकडे अद्याप प्रलंबित आहे. 

श्रीसंत व चव्हाण यांना या प्रकरणात १० जून २०१३ रोजी जामीन मिळाला, तर चंदिलाने आणखी तीन महिने तुरुंगात घालविले. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर श्रीसंत विवाहबंधनात अडकला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्ण यांनी गेल्या २३ मे रोजी या प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी २९ जूनची तारीख दिली होती आणि आरोपींच्या वकिलांना ६ जूनपर्यंत लेखी युक्तिवाद देण्यास सांगितले होते. या प्रकरणात या तीन क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा सहकारी छोटा शकील यांच्यावरही आरोप आहेत. दिल्ली पोलीस विभागाच्या विशेष शाखेने आरोपपत्रात ४२ जणांना आरोपी केले होते. त्यांत ६ फरारी आरोपींचा समावेश आहे.