शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल खेळाडूंना विंडीज संघात स्थान नको’

By admin | Updated: May 23, 2015 01:14 IST

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान देऊ नये, असे मत विंडीजचा महान खेळाडू कर्टली अ‍ॅम्ब्रोस याने व्यक्त केले आहे.

लंडन : आयपीएलमध्ये खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान देऊ नये, असे मत विंडीजचा महान खेळाडू कर्टली अ‍ॅम्ब्रोस याने व्यक्त केले आहे. ‘टाईम टू टॉक’ या स्वत:च्या आत्मकथेच्या प्रचारासाठी लॉर्ड्सवर इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीला उपस्थित राहण्यासाठी आलेला अ‍ॅम्ब्रोस म्हणाला, ‘माझ्या मते आयपीएल खेळणाऱ्या विंडीजच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देऊ नये. मी आयपीएल खेळणाऱ्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण तुम्ही केवळ आयपीएल खेळून देशाच्या राष्ट्रीय संघात हमखास स्थान निश्चित करू शकत नाही. ‘माझ्यामते हा चिंतेचा विषय आहे.’ अ‍ॅम्ब्रोसला वर्षभरापूर्वी तत्कालीन कोच ओटिस गिब्सन यांनी संघाचा गोलंदाजी कोच बनविले होते. नंतर मार्चमध्ये मुख्य कोच बनलेल्या फिल सिमन्स याने देखील अ‍ॅम्ब्रोसला कायम ठेवले. कॅरेबियन संघ लवकरच आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सिमन्सने काल एका वक्तव्यात ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल, कीरोन पोलार्ड, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि लेंडल सिमन्स यांना संघाबाहेर ठेवण्याची ही वेळ नाही, असे म्हटले होते. हे सर्वजण आयपीएल-८ मध्ये खेळत आहेत. गेलने कंबरेच्या दुखण्याचे कारण पुढे करीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून स्वत:ला दूर ठेवले होते. ब्राव्हो आणि सिमन्स यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे. पोलार्डने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी निवृत्ती घेतली. रसेलने कसोटीसाठी मी शारीरिकदृष्ट्या फिट नाही, अशी घोषणा करून टाकली. नरेनच्या गोलंदाजीची शैली सदोष ठरविली आहे. (वृत्तसंस्था)सर्वोत्कृष्ट संघ दौऱ्यावर पाठवायचा आहे. दुर्दैवाने आमचे दिग्गज खेळाडू आयपीएलसाठी बाहेर आहेत. आयपीएल खेळायचे की देशासाठी खेळायचे, हे या खेळाडूंना निश्चित करावे लागेल. - कर्टली अ‍ॅम्ब्रोस