शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लखनौमध्ये आयपीएल शक्य : शुक्ला

By admin | Updated: April 19, 2017 01:48 IST

कानपूरच्या ग्रीन पार्कनंतर आता लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामन्यांचे आयोजन शक्य आहे.

कानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्कनंतर आता लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामन्यांचे आयोजन शक्य आहे. त्यासाठी इकाना स्टेडियम आणि यूपीसीए यांच्यादरम्यान करारावर स्वाक्षरी झाली आहे.आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले की,‘आयपीएलमध्ये मोठा बदल होणार आहे. महसूल वाटपाच्या मुद्यावर आयपीएलचे आयोजन होईल.’ आयपीएलच्या पुढील सत्रात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाचे पुनरागमन होईल. सध्या खेळत असलेल्या गुजरात लायन्स व रायजिंग पुणे सुपर जायंट या संघांबाबतचा निर्णय आयपीएल कमेटीच्या बैठकीमध्ये होईल. तसे बघता हे दोन संघ केवळ दोन वर्षांसाठीच होते. भविष्यात गुजरात व पुणे संघ खेळतील किंवा नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शुक्ला यांनी मंगळवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये १० व १३ मे रोजी होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या तयारीचा आढावा घेतला. गुजरात लायन्सने राजकोटनंतर ग्रीन पार्कची दुहेरी गृहमैदान म्हणून निवड केली आहे.शुक्ला पुढे म्हणाले,‘आता कानपूरसोबतच लखनौच्या क्रिकेट चाहत्यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. कारण लखनौमध्ये इकाना स्टेडियमचे बांधकाम झपाट्याने होते आहे. त्याची प्रेक्षक क्षमता ५० हजार राहणार आहे. या स्टेडियममध्ये अत्याधुनिक सोईसुविधा राहतील. स्टेडियम तयार झाल्यानंतर येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलचे सामनेही होतील, पण त्यामुळे ग्रीन पार्कवर होणाऱ्या सामन्यांवर कुठलाही प्रभाव पडणार नाही. कारण ते जुने व ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम असून त्याची आंतरराष्ट्रीय वर्तुळात ओळख आहे.’आयपीएलच्या पुढच्या सत्रात अनेक बदल होणार आहेत. आता आयपीएल महसूल शेअरिंगच्या आधारावर काम करेल. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या संघांचे पुनरागमन होणार असून खेळाडूंचा लिलाव मोठ्या पातळीवर होणार आहे. खेळाडूंनाही आपला संघ बदलण्याचा व सोडण्याचा अधिकार राहील. आयपीएलचे अकरावे पर्व नवी सुरुवात राहणार आहे. गुजरात लायन्स व पुणे सुपर जायंट या संघांबाबतचा निर्णय समितीच्या बैठकीमध्ये होईल. ’गुजरात लायन्सचा संघ बाहेर झाला तर ग्रीन पार्कमध्ये पुढील वर्षी आयपीएलचे सामने होणार नाहीत का, याबाबत बोलताना शुक्ला म्हणाले, किंग्स इलेव्हन पंजाबची मालकिन अभिनेत्री प्रीटी झिंटा कानपूरला आपले दुसरे गृहमैदान बनविण्यासाठी तयार आहे. कानपूरमध्ये जर फाईव्ह स्टार हॉटेलची उणीव नसती तर येथे अनेक आयपीएल संघांची सामने आयोजित करण्याची तयारी होती. लखनौचे स्टेडियम सज्ज झाले म्हणजे तेथे आयपीएलचे अनेक सामने होऊ शकतात. कारण तेथे अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत, असेही शुक्ला यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)