शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 - धोनीच्या फटकेबाजीने पुण्याचा हैदराबादवर "सुपर" विजय

By admin | Updated: April 22, 2017 19:45 IST

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पुणे सुपर जायंटसने सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 22 - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पुणे सुपर जायंटस संघाने सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला. महेंद्रसिंह धोनी या विजयाचा शिल्पकार ठरला. आयपीएलचा दहावा हंगाम सुरु झाल्यापासून खराब फॉर्मवरुन सातत्याने टीकेचा सामना करणा-या धोनीने आज टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. 
 
शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना धोनीने आपल्या स्टाईलमध्ये चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादने विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले होते. धोनीने 34 चेंडूत नाबाद (61) धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. मनोज तिवारी आणि धोनीने 23 चेंडूत नाबाद 58 धावांची भागीदारी करुव विजय खेचून आणला. 
 
अजिंक्य रहाणे अवघ्या दोन धावांवर स्वस्तात माघारी परतल्यानंतर सलामीवीर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरला. राहुलने (59) धावांची अर्धशतकी खेळी केली तर, स्मिथने (27) धावा केल्या. पाच सामन्यात अवघे दोन विजय मिळवणा-या पुण्याला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता तसेच धोनीचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा विषय बनला होता. धोनीने आज आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत डोळयाचे पारणे फेडणारी फटकेबाजी केली.
 
हैदराबादकडून डेव्हीड वॉर्नर आणि शिखर धवनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने (43) आणि धवनने (30) धावा केल्या. हाणामारीच्या षटकांमध्ये हेनरीक्सने तुफान फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत नाबाद (55 )धावा केल्या. हुडाने (19) धावांवर नाबाद राहून त्याला चांगली साथ दिली. हेनरीक्सने त्याच्या अर्धशतकी खेळीत दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. हैदराबादने पुण्याच्या शादुर्ल ठाकूरची गोलंदाजी फोडून काढली. शार्दुलच्या चार षटकात 50 धावा वसूल केल्या. त्याला एकही विकेट घेता आला नाही.