शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

IPL 10 - गुजरातला नमवून हैदराबादचा "प्लेऑफ"मध्ये प्रवेश

By admin | Updated: May 13, 2017 19:40 IST

सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या हैदराबादने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कानपूर, दि. 13 - आयपीएलमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या हैदराबादने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. गुजरातने विजयासाठी दिलेले 155 धावांचे लक्ष्य हैदराबादने 19 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. 
 
कर्णधार डेव्हीड वॉर्नर नाबाद (69)  आणि वी.शंकर नाबाद (63) यांनी शेवटपर्यंत टिकून हैदराबादचा विजय सुनिश्चित केला. दोघांनी दुस-या विकेटसाठी नाबाद 133 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी दमदार सुरुवातीनंतर गुजरातच्या 43 धावात दहा विकेट गेल्या. मोहम्मद सीराज आणि राशिद खान या जोडीने सात विकेट घेऊऩ गुजरातच्या डावाला खिंडार पाडले.
 
प्लेऑफ मधील स्थान निश्चित करण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला सुरुवातीलाच दोन झटके बसले होते. सलामीवीर शिखर धवन (18) आणि हेनरीक्स(4) स्वस्तात बाद झाले होते. पण डेव्हीड वॉर्नर आणि शंकरने हैदराबादला विजय मिळवून दिला. 
 
प्रथम फलंदाजी करताना गुजरात लायन्सचा डाव 154 धावांवर आटोपला. इशान किशन (61) आणि स्मिथने (54) भक्कम सलामी दिली. अवघ्या दहा षटकात दोघांनी 111 धावा चोपून काढल्या. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.