शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू

By admin | Updated: June 16, 2015 02:05 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू असल्याचे मत वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने व्यक्त केले. आयपीएल तसेच कर्णधार महेंद्रसिंह धोनी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू असल्याचे मत वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने व्यक्त केले. आयपीएल तसेच कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने दिलेल्या संधीच्या बळावर मी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ शकलो, असेही मोहित म्हणाला.आॅगस्ट २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून मोहितने २० वन-डे आणि चार टी-२० सामने खेळले. अंतिम ११ जणांत त्याला नियमित स्थान मिळू शकले नव्हते; पण तो संघाचा नियमित सदस्य मात्र राहिला. संघात आपली उपयुक्तता वेगवेगळी असल्याचे फरिदाबादच्या या खेळाडूला वाटते. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशाकडे रवाना होण्याआधी मोहित म्हणाला, ‘‘खरे तर मी अद्यापही स्वत:ला नवखा मानतो. पदार्पण केल्यापासून मी गोलंदाजी आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. चांगल्या कामगिरीच्या बळावरच भारतीय संघात स्थान मिळते, हे चांगले लक्षात असल्याने मी हे स्थान टिकविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखत आहे.’’ मोहित पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी स्वत:ला सिद्ध करीत आहे. २०१३मध्ये याच दौऱ्यात त्याने पहिल्यांदा संघात स्थान मिळविले होते. मोहित हा उमेश यादव किंवा वरुण अ‍ॅरोनसारखा वेगवान नसला, तरी योग्य लय आणि दिशा यांचा समन्वय साधून तो गोलंदाजी करीत असतो. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणारा मोहित म्हणाला, ‘‘मी वेगवान मारा करीत नसेन; पण चांगला मारा करू शकतो, याची खात्री आहे. मी १३५ किंवा १४० कि.मी. ताशी वेगाने मारा करतो. वेगवान चेंडू टाकण्याऐवजी योग्य टप्प्यावर चेंडू टाकले, की गोलंदाज ‘बिट’ होतो.’’ कसोटी क्रिकेट पदार्पणाच्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल विचारताच तो म्हणाला, ‘‘पाच दिवसांचे सामने खेळण्याइतपत फिटनेस आवश्यक असल्यामुळे सध्या फिटनेसवर अधिक लक्ष देत आहे.’’ (वृत्तसंस्था)