आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात
By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST
नाशिक : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या क्रीडामंडळाच्या अंतर्गत नाशिक विभागाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा मविप्र संचलित ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले. स्पर्धेचे उद्घाटन मविप्र संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाच्या क्रीडामंडळाचे सदस्य प्रा. दिलीप लोंढे, नाशिक विभागाचे सचिव प्रा. डॉ. नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या पुरुष संघात १६ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यात बीवायके महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला गटात सहा संघांनी सहभाग घेतला. यात के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद, तर बीवायके महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. यावेळी प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार, प्रा. आर
आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात
नाशिक : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या क्रीडामंडळाच्या अंतर्गत नाशिक विभागाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा मविप्र संचलित ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले. स्पर्धेचे उद्घाटन मविप्र संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाच्या क्रीडामंडळाचे सदस्य प्रा. दिलीप लोंढे, नाशिक विभागाचे सचिव प्रा. डॉ. नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या पुरुष संघात १६ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यात बीवायके महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला गटात सहा संघांनी सहभाग घेतला. यात के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद, तर बीवायके महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. यावेळी प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार, प्रा. आर. एस. कारे, कुणाल पोतदार यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. फोटो २१एसपीओ२